शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मटका व्यवसायात भागीदारी

By admin | Updated: May 29, 2014 01:28 IST

आठजणांना अटक

कोल्हापूर : मटका व जुगारात भागीदारी करणार्‍या बुकीएजंटासह मटका खेळणार्‍या आठजणांना आज, बुधवारी करवीर पोलिसांनी अटक केली. फुलेवाडी नाक्यासमोर साखळी पद्धतीने मटका घेताना जालंदर शिंदे याच्यासह श्रीकृष्ण ऊर्फ विजय सकट व विष्णू जाधव यांना अटक केली होती. त्यांच्याकडून रोख ८ हजार २२५ रुपये व ८ मोबाईल हँडसेट असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फुलेवाडी नाक्यासमोर श्रीकृष्ण सकट हा मटका घेत असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना सकट याला अटक केली. त्यानंतर त्याला मदत करणारे विष्णू जाधव व जालंदर शिंदे या दोघांनाही अटक केली. हे तिघे एकमेकाला मटका फिरवत होते. जालंदर शिंदे हा मटक्याचा खेळ पुढे कोणाला फिरवत होता याची माहिती घेतली असता एजंटासह मटका खेळणार्‍यांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकातील संजय पडवळ, बाबूराव घोरपडे, प्रथमेश पाटील, राजेंद्र बरगाले, प्रशांत घोलप यांनी संशयित राजेंद्र ज्ञानू जांभळे (वय ३२, रा. बालिंगा, ता. करवीर), प्रवीण प्रकाश हर्षे (२५), मंगेश प्रकाश हर्षे,(३०), गजानन बाळासो शिंदे (३४, तिघे रा. जुना बुधवार पेठ), शरद बाळकृष्ण मोरे (४३, रा. सोनतळी, ता. करवीर),अवधूत जगन्नाथ भालेरे (५८, मस्कृती तलाव), महिपती बापू पोवार (६१, डी वॉर्ड, तोरस्कर चौक), संदीप शिवलिंग गवळी (२९, गवळी गल्ली, शनिवार पेठ) आदींना त्यांच्या घरी अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी काहीजणांचा समावेश आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय गुरखे करीत आहेत. (प्रतिनिधी)