कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विचारांची ओळख मुलांना व्हावी या उद्देशाने लोकमत बालविकास मंचतर्फे बाल शाहू वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांच्या व मुलांच्या आग्रहास्तव या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उद्या, शनिवारपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. चला तर मग..! आजच आपल्या मुलाचे झक्कासपैकी छायाचित्र काढून आमच्याकडे पाठवून द्या. या स्पर्धेत बालवाडी ते दहावीमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांनी शाहू महाराजांची वेशभूषा करून आपला ५ बाय ७ इंच या आकारातील छायाचित्र काढून त्यावर आपले नाव, शाळेचे नाव, इयत्ता व मोबाईल क्रमांक लिहून ‘लोकमत’ कार्यालयात उद्या, शनिवार सायंकाळपर्यंत जमा करायचे आहेत. ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. त्यामध्ये बालवाडी ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी असे गट आहेत. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र अशी पाच बक्षिसे आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. आतापर्यंत शेकडो छायाचित्रे ‘लोकमत’कडे जमा झाली असून पालकांच्या आग्रहास्तव या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, दुसरा मजला, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा किंवा प्रियांका - ८६००३७२२०१ यांच्याशी संपर्क साधावा.
बालशाहू वेशभूषा स्पर्धेत सहभागी व्हा..!
By admin | Updated: July 1, 2016 00:18 IST