शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पार्लेत ‘स्वाभिमानी’ने रोखली ऊसतोड-फडात घुसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:32 IST

कºहाड : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना दिला होता

ठळक मुद्देअगोदर उसाचा हप्ता जाहीर करा, मगच कोयता लावाकारखान्यांकडून उसाचा पहिला हप्ता जाहीर झाला नसताना कशी काय ऊसतोड सुरू केली? कारखान्यांचा टोळ्या ऊसतोड करण्यासाठी कºहाड तालुक्यात दाखल झाल्या

कºहाड : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना दिला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी कºहाड तालुक्यातील काही गावांत ऊसतोड सुरू केली. त्यामुळे अगोदर उसाचा हप्ता जाहीर करा, मगच कोयता लावा, असे सांगत सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्ले येथे सुरू असलेली ऊसतोड फडात जाऊन बंद पाडली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानीचे नेते अनिल घराळ, कºहाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम, आदींची उपस्थिती होती.कºहाड तालुक्यातील पार्ले येथे कारखान्यातील टोळीकडून ऊसतोड सुरू करण्यात आलीअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी मिळाली.

त्यानंतर ते पार्ले येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असलेल्या फडात गेले. कारखान्यांकडून उसाचा पहिला हप्ता जाहीर झाला नसताना कशी काय ऊसतोड सुरू केली? अशी विचारणा त्या ठिकाणी असलेल्या कारखान्यांच्या टोळीमालकांना केली. जोपर्यंत कारखान्यांकडून पहिला हप्ता जाहीर केला जात नाही, तोपर्यंत उसाची एकही कांडी तोडू नये, असे सांगत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. जिल्ह्यासह तालुक्यातील कारखान्यांचा टोळ्या ऊसतोड करण्यासाठी कºहाड तालुक्यात दाखल झाल्या आहेत. पहिला हप्ता कारखान्यांनी ३४०० जाहीर करावा, अन्यथा एकाही कारखान्याच्या टोळीस ऊसतोड करू देणार नाही. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्या अनुषंगाने सोमवारी पार्ले कारखाना टोळ्यांकडून सुरू असलेली ऊसतोड संघटनेच्या पदाधिकाºयांनी बंद पाडली.

कारखान्यांनी शेतकºयांना चांगला ऊसदर द्यावा, अशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. शेतकºयांनीही या आंदोलनास पाठिंबा द्यावा. त्यांनी जोपर्यंत कारखान्यांकडून पहिला हप्ता योग्य प्रकारे दिला जात नाही, तोपर्यंत आपल्या उसाची तोड करू देऊ नये व स्वाभिमानीच्या आंदोलनास सहकार्य करावे. कारण हे आंदोलन सर्वसामान्य शेतकºयांच्या हितासाठी करण्यात येत आहे.- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातार

जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची पहिली ठिणगीउसाचा पहिला हप्ता ३४०० रुपये कारखान्यांनी जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्यापही संघटनेची मागणी मान्य केलेली नाही. अशात सोमवारी कºहाड तालुक्यातील पार्ले परिसरात कारखान्यांनी ऊसतोड सुरू केल्याने त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी कºहाड तालुक्यातून पडली असल्याचे यावेळी दिसले.

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंप