शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

आई-बाबा, स्वत:साठी, आमच्यासाठी मास्क वापरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आई-बाबा, स्वत:सह आमच्यासाठी मास्क प्राधान्याने वापरा, असे भावनिक आवाहन शालेय विद्यार्थ्यांनी ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आई-बाबा, स्वत:सह आमच्यासाठी मास्क प्राधान्याने वापरा, असे भावनिक आवाहन शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना दक्षता घेण्याबाबतचा सल्ला दिला. त्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी ‘रियालिटी चेक’ केले. आई-वडील घरातून बाहेर पडताना आ‌वर्जून मास्क वापरतात. सॅनिटायझरचा उपयोग करतात. बाहेरून घरामध्ये आल्यानंतर हात-पाय स्वच्छपणे धुतात असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. कामाच्या गडबडीत काहीवेळा त्यांच्याकडून हे राहिल्यास आम्ही त्यांना त्याची आठवणही करून देत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

चौकट

स्वत:ची काळजी घ्या आणि आई-बाबांचीही काळजी घ्या !

प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

प्रतिक्रिया

माझे बाबा कामावर जाताना मास्क, सॅनिटायझर वापरतात. घरी आल्यानंतर पहिल्यांदा हात-पाय स्वच्छ धुतात. आईदेखील कोरोनाच्या नियमांचे पालन करते. कोरोना पुन्हा वाढत असल्याने आम्ही काळजी घेतो.

-वैष्णवी कांबळे, इयत्ता नववी, सोनाळी

कामानिमित्त घरातून बाहेर जाताना माझे आई-वडील मास्कचा वापर करतात. सॅनिटायझरही सोबत ठेवतात. बाहेरून घरामध्ये आल्यावर हात-पाय धुतल्यानंतर इतर कामे करतात.

-अरशद महालकरी, इयत्ता नववी, मंगळवारपेठ

माझे आई-बाबा दोघेही नोकरदार आहेत. ते कामानिमित्त दिवसभर बाहेर आहेत. त्यामुळे ते मास्क, सॅनिटायझर वापरतातच. घरामध्ये आल्यानंतर आंघोळ करून अन्य कामे करतात. घरातून बाहेर जाताना त्यांनी मास्क विसरल्यास त्यांना मी आठवण करून देतो.

-अखिलेश कदम, इयत्ता पाचवी, फुलेवाडी.

माझे आई, वडील आणि भाऊ हे मास्क, सॅनिटायझरचा वापर करतात. मीदेखील शाळेत जाताना ते आवर्जून वापरतो. कोरोना वाढत असल्याने शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यावी. आपल्या आई-वडिलांनाही त्याची आठवण करून द्यावी.

-मनस्वी आडनाईक, इयत्ता सातवी, अंबाईटँक परिसर.

माझे आई, बाबा कामासाठी बाहेर जाताना सॅनिटायझर, मास्कचा वापर करतात. माझी शाळा अद्याप सुरू झालेली नाही. पण, आई अथवा बाबांसमवेत बाहेर जाताना मी सॅनिटायझर, मास्कचा वापर करते. -ईश्वरी पाटील, इयत्ता दुसरी, कसबा बावडा

आम्ही घरातील सर्वजण मास्क, सॅनिटायझरच्या वापर करतो. काहीवेळा कामाच्या गडबडीत आई किंवा बाबा हे मास्क विसरून घरातून बाहेर पडल्यास ते लक्षात येताच लगेच घरात येऊन ते पुन्हा घेऊन जातात.

-युवराज देशमुख, इयत्ता सातवी, ताराबाई पार्क

प्रतिक्रिया

कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर जाताना घरात असलेल्या अन्य कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासह कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

-डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी

फोटो (२८०२२०२१-कोल-वैष्णवी कांबळे (विद्यार्थी), अरशद महालकरी (विद्यार्थी), मनस्वी आडनाईक (विद्यार्थी), युवराज देशमुख (विद्यार्थी), ईश्वरी पाटील (विद्यार्थी), अखिलेश कदम (विद्यार्थी).