शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी केली जि. प. शाळा आदर्शवत--शिरढोणमधील आदर्शवत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:31 IST

कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन अद्ययावत व दर्जेदार शिक्षण पाल्यांना मिळावे, यासाठी पालकांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.

सध्या खासगी शिक्षण संस्थांना पेव फुटले असून, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या टोलेजंग इमारती, मैदान, विद्यार्थी-पालकांना भुरळ पाडणारी शैक्षणिक सुविधा, बससेवा यांमुळे अनेक ठिकाणी दर्जेदार शिक्षणापेक्षा पालकांना आकर्षित करणाºया शिक्षण संस्थांच्या योजनांमुळे पालक जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षणाला डावलून मोठ्या रकमेची शैक्षणिक फी भरून पाल्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जाही शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घसरला आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांचे फावत आहे. परिणामी, अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. अशा स्पर्धांत्मक स्थितीतही शाळा टिकविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला आहे. येथील कुमार विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांचे शिक्षण दर्जेदार असले तरी त्याला अद्ययावत रूप देण्यासाठी पालक पुढे आले आहेत.खासगी शिक्षण संस्थेतील ई-लर्निंग वर्ग या शाळेत सुरू करण्यासाठी शिक्षण व पालकांनी सहभाग घेतला आहे. पन्नास हजार रुपये वर्गणी गोळा करून ई-लर्निंग वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये वर्गात डिजिटल फलकाद्वारे भिंती बोलक्या केल्या आहेत. संगणकांची माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन, सणांची, किल्ल्यांची ओळख, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, राष्ट्रीय प्रतीके, सुविचार, आदींच्या माध्यमातून भिंती बोलक्या केल्या आहेत.प्रोजेक्टद्वारे पडद्यावर विद्यार्थ्यांना सर्वच विषयांचे शिक्षण दिले जात आहे. करमणूक करीत ज्ञानदान केल्याने विद्यार्थी सर्वच विषय आवडीने शिकत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना या शाळा टिकविण्यासाठी पालकांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत ठरत आहे.