शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पालकांनो सावधान : अल्पवयीन मुलाला गाडी दिल्यास गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:11 IST

कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे नवे पाऊल

कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. या हौशी मुलांना आवर घालण्यासाठी पोलीस दलाने मंगळवारपासून कठोर पाऊल उचलले आहे. अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना सापडल्यास त्यांच्यासह पालकांना हजार रुपये दंड भरावा लागणार तर आहेच, शिवाय अपघात झाल्यास गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुलांबरोबर पालकांनाही शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पालकांनो सावधान, मुलांना गाडी देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.

वाहनांची रहदारी वाढल्यामुळे सर्व मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत महाविद्यालयीन तरुण बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. मोटारसायकलवर तिब्बल सीट बसून काही शाळकरी मुले, मुली भरधाव जाताना दिसत आहेत. उच्चभ्रू लोकांची मुले शाळा किंवा महाविद्यालयात येताना किमती आलिशान मोटारसायकल घेऊन येतात. त्यांची ‘स्टाईल’ मारण्याची पद्धत वेगळीच असते. शहर वाहतूक पोलिसांच्या समोरून महाविद्यालयीन तरुण सायरन काढून मोटारसायकली सुसाट वेगाने चालवत असतात. काहीवेळा ट्रिपल सीटवरून बिनदिक्कतपणे फिरत असतात. ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून अल्पवयीन मुले दुचाकीवर दिसल्यास कारवाई सत्र सुरू केले आहे.तीन महिन्यांचा कारावासमोटार वाहन कायदा कलम १८० नुसार अल्पवयीन मुलांचे पालक तसेच वाहनांचे मालक यांचेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्णातील ३१ पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या गुन्ह्णासाठी तीन महिन्यांचा कारावास किंवा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मंगळवारी दिवसभरात मुलांना दुचाकी दिल्याचा फटका पन्नास पालकांना बसला. जागेवर हजार रुपयांची पावती फाडावी लागली.दंडाची प्रक्रियाअठरा वर्षांखालील मुलेवाहन चालवितानासापडल्यास : १ हजार‘नो पार्किंग’मध्ये वाहनपार्किंग करणे : २००एकेरी मार्ग (वन वे)तोडणे : २००सिग्नल तोडणे : २००फॅन्सी नंबरप्लेटलावणे : १ हजारवाहन चालविण्याचा परवाना नसणे : १ हजारकर्कश हॉर्न लावून आवाज करणे : ५००वाहन रजिस्टर नसणे : १ हजारविमा नसणारे वाहनचालविणे : २३०० 

अठरा वर्षांखालील मुलांना समज आलेली नसते. त्यामुळे ते विचार न करता मोटारसायकल चालवत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या हातात वाहन देऊ नका, कायद्यात नवीन तरतूद झाली आहे. मुलासह पालकांवर गुन्हा दाखल केला जाईल.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर