शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे नंदनवन, कचऱ्याची नाराजी

By admin | Updated: February 2, 2015 00:17 IST

औषध फवारणीची वानवा : गटारींचे नियोजन फसले; प्रॉपर्टी कार्डांचा प्रश्न गंभीर

सुभाषनगर प्रभागात नगरसेवक सतीश घोरपडे यांचा दांडगा संपर्क आहे. प्रभागातील महापालिकेच्या शाळेचेही त्यांनी नंदनवन केले आहे. मात्र, प्रभागातील कचरा उठाव वेळच्या वेळी होत नाही; तर सरनाईक कॉलनी येथे गटारीचे नियोजन नसल्याने येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सुभाषनगर म्हणजे ८० टक्के कष्टकरी व २० टक्के उच्चवर्गीय लोकांचा प्रभाग होय. सरनाईक वसाहत, जवाहरनगर, सुभाषनगर, वर्षानगर, संभाजी हौसिंग सोसायटी, संत रोहिदास कॉलनी या प्रमुख वसाहती या प्रभागात येतात. येथे नगरसेवक सतीश घोरपडे यांचा संपर्क आहे. त्यांनी येथील स्थानिक समस्या जाणून घेऊन एक-एक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागात कष्टकरी लोक राहत असल्याने येथील पालकांचे मुलांच्या शाळेकडे दुर्लक्ष होत होते; त्यामुळे त्यांनी महापालिकेची शाळा सुधारणासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. शाळेच्या इमारतीची डागडुजी व रंगरंगोटीसह शाळेभोवती कंपाउंड उभारण्यात आले आहे. शाळेतील मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात आले. तसेच शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने दिवसेंदिवस शाळेतील मुलांची संख्या वाढत आहे. प्रभागातील अंतर्गत रस्ते चांगले झाले आहेत. तसेच काही भागांतील गटारींचे कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रभागातील अंतर्गत रस्ते व गटारीच्या समस्या नाहीशा झाल्या आहेत. मात्र, सम्राटनगर येथून सुभाषनगर चौकातील साईमंदिरापर्यंतचा रस्ता अजूनही खराब असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या रस्त्यावर मोठी खडी टाकून त्यावर फक्त डांबरच टाकले आहे. हा रस्ता व्हावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नगरसेवकांनी येथील पाण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, सरनाईक वसाहत येथे कचरा गाडी वेळच्यावेळी येत नाही. या वसाहतीसमोरील गल्लीत कचरा उठाव करण्यासाठी गाडी येते; मात्र ‘तुमच्या प्रभागासाठी ही कचरा उठावाची गाडी नाही,’ असे त्यावरील कर्मचारी सांगतात. त्यामुळे आमच्या प्रभागात वेळच्या वेळी गाडी यावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. तसेच या ठिकाणी गटारींचे नियोजन नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच औषध फवारणीही केली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रभागातील काही भागांतील प्रॉपर्टी कार्डांचा प्रश्न गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी नागरिकांमधून कित्येक दिवसांपासून मागणी होत आहे. नगरसेवकांची भागात फेरी असते. त्याचप्रमाणे नगरसेवक दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत घरी भेटून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रभागात विविध सव्वादोन कोटींची विकासकामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत रस्ते केले आहेत. गटारींची कामे करण्यात आली आहेत. महापालिकेच्या सुभाषनगर हायस्कूलचे नाव बदलून आता ‘संत रोहिदास विद्यालय’ असे नामकरण करण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. राजीव गांधी आवास योजनेतून घर बांधण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. - सतीश घोरपडे, नगरसेवकउद्याचा प्रभाग क्रमांक - ६७ राजलक्ष्मीनगर