शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

पार्सलसाठी आता कागदी डबे--: हॉटेल व्यावसायिकांचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:40 PM

केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय देण्याच्या दृष्टीने काही पावले टाकली आहेत.

संतोष मिठारी ।कोल्हापूर : एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला (सिंगल यूज प्लास्टिक) पर्याय म्हणून जेवणाचे पार्सल देण्यासाठी जाड कागदी आणि पुन्हा वापरता येतील असे प्लास्टिकचे डबे वापरणे, अनामत रक्कम घेऊन स्टीलचे डबे देण्याची सुविधा पुरविण्याचे कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांनी पाऊल टाकले आहे.

केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय देण्याच्या दृष्टीने काही पावले टाकली आहेत. मुंबई, पुणे येथील संघटनांशी या संघाने चर्चा केली आहे. कोल्हापुरात सध्या जेवण, खाद्यपदार्थ पार्सल म्हणून देण्यासाठी सध्या कागदी आणि पुन्हा वापरता येतील अशा प्लास्टिक डब्यांचा उपयोग केला जात आहे. काही व्यावसायिकांनी पार्सलसाठी अनामत रक्कम घेऊन स्टीलचे डबे देण्याचा पर्याय निवडला आहे. पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळण्यासाठी हॉटेलमध्ये शुद्धिकरण यंत्रणा बसविली आहे. प्रत्येक टेबलवर काचेचा जार, ग्लास ठेवले आहेत. पर्यावरण रक्षणासह पाणीबचतीसाठी ‘अर्धा ग्लास पाणी’ संकल्पना गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरणतज्ज्ञ यांच्या माध्यमातून ग्राहक, व्यावसायिकांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन केले जात आहे.‘अ‍ॅल्युमिनिअम’बाबत स्पष्टता हवीअ‍ॅल्युमिनिअम फॉईल्सचे कंटेनर (डबे) अथवा कागद यांचा पार्सलसाठी वापर करण्याचा चांगला पर्याय आहे; मात्र ते वापरू नये, इतकेच महानगरपालिकेकडून सांगितले जात आहे. त्याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी काही व्यावसायिकांमधून होत आहे. 

पार्सलसाठी वापरल्या जाणाºया ५०० ते १००० मि.लि. क्षमतेच्या कागदी डब्यांसाठी ११ ते १४ रुपये द्यावे लागतात. त्याचा भुर्दंड आमच्यासह ग्राहकांना बसत आहे. कागदी डब्यातून पार्सल देताना अनेकदा अडचणीचे ठरत आहे. त्याचा विचार करून किमान ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी.- सिद्धार्थ लाटकर, हॉटेल व्यावसायिक 

प्लास्टिकचा वापर टाळणे आज काळाची गरज आहे. आम्ही हॉटेल मालक, व्यावसायिकांनी बहुपयोगी प्लास्टिक डबे, कागदी कप, डबे अशा पर्यायांचा स्वीकार केला आहे. पार्सलसाठी स्टील डबे, कापडी पिशव्या आणाव्यात, असे ग्राहकांना आवाहन केले आहे. - आनंद माने, हॉटेल व्यावसायिक 

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत हॉटेल व्यावसायिकांना सूचनांसह कागदी डबे, कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार कार्यवाही केली नाही, तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.- दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा 

पाण्यासाठी काचेचे ग्लास आणि जार, पार्सलसाठी कागदी डबे आणि पिशव्यांचा वापर केला जात आहे; मात्र यातील काही पर्यायांचा वापर करताना अडचणी निर्माण होत आहेत. सिंगल यूज प्लास्टिकला सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय विद्यापीठ, महाविद्यालयातील संशोधक अथवा पर्यावरणतज्ज्ञांनी द्यावा.- सचिन शानबाग, उपाध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ

 

  • जिल्ह्यातील लहान-मोठ्या हॉटेल्सची संख्या 6000

 

  • शहरातील हॉटेल्सची 450संख्या
टॅग्स :hotelहॉटेलPlastic banप्लॅस्टिक बंदी