शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘पपई’ची लागवड उत्पन्नाचा नवा माग

By admin | Updated: February 3, 2015 00:28 IST

दोन वर्षांचे पीक : आंतरपिकाचाही नफा; दुसऱ्या वर्षी किमान सव्वा लाख रुपये निव्वळ उत्पर्न्न

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात तसे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अग्रेसर आहेत. अल्पभूधारक असो वा अल्प पाण्याचे क्षेत्र असो, जमिनीची प्रत आणि उपलब्ध परिस्थितीचा फायदा घेत पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यात निष्णात आहेत. पपईची लागवड हाही एक प्रयोग होय. करवीर तालुक्यातील आरे येथील अनिल रघुनाथ पाटील यांनी मित्र महेश चौगले-साळोखे यांच्या सल्ल्यानुसार पपईची लागवड करून दोन वर्षांत रगड उत्पन्न मिळविण्याचा मार्ग अवलंबला आहे.शेतीमध्ये नवीन काही करण्याच्या जिद्दीने खासगी कंपनीतील नोकरी सोडून अनिल पाटील यांनी पपईची लागवड केली. त्यांना वडील ‘भोगावती’चे माजी वरिष्ठ लिपिक आर. वाय. पाटील, आई इंदुबाई, पत्नी गायत्री, तर भाऊ धनंजय, भावजय स्वप्नाली यांनी मोलाची मदत केली. १५ गुंठे शेतजमिनीत ट्रॅक्टरने दोनवेळा नांगरट केली. तीन ट्रॉल्या शेणखत टाकले व पावणेचार फूट अंतराने सरी सोडली. १५ जानेवारी २०१४ रोजी पेरणी करून मे २०१४ ला अंतरपिकातून भुईमुगाचे तीन क्विंटल उत्पन्न घेतले. मोहोळ (जि. सोलापूर) येथील नर्सरीतून ३८० पपईची रोपे आणली. वाहतुकीसह एक रोप १४ रुपयांना पडले. मार्च २०१४ मध्ये भुईमुगाचे आंतरपीक असताना पपईची लागवड केली. त्यानंतर ‘ग्रो’ जैविक खताची आळवणी दर १५ दिवसांनी तीनवेळा केली. तसेच वारणा सेंद्रिय खताची दोन पोती वापरली. दर महिन्याला ‘डीएपी’चे एक पोते व सूक्ष्म अन्नद्रव्याची दोन पोती खते वापरली. आंतरमशागत, पाण्याचा फेर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी, तर थंडीमध्ये १२ दिवसांनी देत असून, सरीमध्ये पाट पाण्याची पद्धती आहे. पाच महिन्यांनंतर पपईची भरणी केली. भरणीनंतर पपईची उंची पाच ते सहा फुटांपर्यंत जाते. दर पंधरा दिवसांनी फोर्स व सिबुस या कीटकनाशकांची फवारणी केली.साधारणत: सव्वा लाखाचे उत्पन्न खात्रीशीर मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांना त्यांचे बंधू कृषी अधिकारी एम. डी. पाटील (आरे) यांचे मार्गदर्शन लाभले.- मधुकर डाफळे ल्ल कोगे