शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

पानसरे यांची हत्या अर्थव्यवहारातून शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 19:22 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या लाखो रुपयांचा तपशील निवडणूक आयोगालाही दिलेला नाही. त्यामुळे या पैशांतूनच कॉ. पानसरे यांची हत्या झाली असल्याचा पुनरूच्चार हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्टÑचे समन्वयक मनोज ...

ठळक मुद्देवीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुनरूच्चार : ‘श्रमिक’ पतसंस्थेत भाकपचे नावे ४५ लाखांच्या ठेवीत्या दिशेने पोलीस तपास करण्याची मागणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या लाखो रुपयांचा तपशील निवडणूक आयोगालाही दिलेला नाही. त्यामुळे या पैशांतूनच कॉ. पानसरे यांची हत्या झाली असल्याचा पुनरूच्चार हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्टÑचे समन्वयक मनोज खाड्ये, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. या पतसंस्थेत ठेवी सन २०१५-१६ या वर्षात दिसून येत असून त्या आधीपासून या ठेवी ठेवल्या असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

अ‍ॅड. इचलकरंजीकर म्हणाले, तथाकथित पुरोगामी आणि साम्यवादी मंडळींनी समाजहिताच्या नावाखाली जमवलेली बेहिशेबी मालमत्ता आणि आर्थिक घोटाळे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार ३५२ रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या रकमेबाबत कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय अन् सीबीआय यांच्याद्वारे करावी, अशीही मागणी करण्यात आली.पानसरे हे भाकपच्या राज्य कार्यकारिणी सचिव, राष्टÑीय कार्यकारिणी सदस्य होते. श्रमिक नागरी पतसंस्थेत सन २०१५-१६ मध्ये आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्या नावे विविध खात्यांवर सुमारे ४५,५१,३५२ रुपयांच्या ठेवी आहेत. भाकप हा राष्टÑीय स्तरावरील पक्ष असून त्याने आयकर आणि निवडणूक आयोगाला या ठेवी लेखापरीक्षणात दाखविलेल्या नाहीत. या पैशांतूनच पानसरे यांची हत्या झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यवहाराची अंमलबजावणी संचनालय, सीबीआय, आयकर, केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग, पोलीस यांनीही तपास करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेस बंडा साळोखे, महेश उरसाल, पतित पावन संघटनेचे सुनील पाटील हेही उपस्थित होते.देशस्तरावरील पक्षाचे एकाच ठिकाणी आर्थिक अहवाल सादर होतात. त्यामुळे जर या पतसंस्थेतील ठेवी पक्षाने आपल्या देशस्तरीय आर्थिक कागदपत्रांत दाखविले नसतील तर पक्षाच्यावतीने पानसरे किंवा अन्य कार्यकर्ते पक्षाचा हा काळा पैसा सांभाळत होते, पक्षाला माहीतच नसताना पानसरे किंवा अन्य कार्यकर्ते स्वत:चा काळा पैसा पक्षाच्या नावावर ठेवत होते, अन्य कोणाचा तरी काळा पैसा पक्षाच्यावतीने सांभाळला जात होता, असेही निकष निघू शकतात, असेही इचलकरंजीकर म्हणाले.गौरी लंकेश यांच्याही आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी

गौरी लंकेश यांच्या प्रकरणातही भविष्यात आरोपाचे संकट ओढावू नये यासाठी कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार आणि कर्नाटक पोलीस यांनी आताच गौरी लंकेश यांच्याही व्यवहाराची चौकशी करावी. त्याचे मोबाईल संभाषण, बँक खात्यांचे, आर्थिक व्यवहाराचे सर्व तपशील तपासावेत, अशीही मागणी अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी यावेळी केली.