शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंना युवा कलाकारांची अनोखी श्रद्धांजली

By admin | Updated: October 27, 2015 00:20 IST

‘तरंग’ लघुचित्रपटाची निर्मिती : आठ मिनिटांच्या लघुपटात अण्णांच्या कार्याची महती

संजय थोरात- नूल -दीन-दलित कष्टकरी आणि राबणाऱ्यांच्या पाठीशी सतत ढालीसारखे राहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. कॉ. अण्णांना श्रद्धांजली म्हणून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील युवा कलाकारांनी लघुचित्रपट (शॉटफिल्म) तयार केला आहे. ‘तरंग’ असे चित्रपटाचे नाव आहे. अवघ्या आठ मिनिटांचा हा लघुचित्रपट कॉ. अण्णांच्या कार्याची महती स्पष्ट करून जातो.कॉ. अण्णा नेहमीच फेरीवाले, गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या पाठीशी असायचे. त्यांची झालेली हत्या या युवा कलाकारांच्या मनाला चटका लावून गेली. कॉ. अण्णांना कृतीतून श्रद्धांजली वाहण्याची कल्पना मोहित तानाजीराव घाटगे या युवा दिग्दर्शकाला सूचली अन् ‘तरंग’ हा लघुचित्रपट निर्माण झाला. आजऱ्याच्या रंगभूमी प्रॉडक्शनने त्याची निर्मिती केली. चार महिने या विषयावार अभ्यास व चर्चा झाली. गडहिंग्लजच्या बसस्थानकावर लघुचित्रपटाचे शुटिंंग केले गेले.इयत्ता चौथीत शिकणाऱ्या चितळे (ता. आजरा) येथील आदिती अशोक तरडेकर व इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या गणेशवाडी (ता. आजरा) च्या करण गावडे या बाल कलाकारांची यात मुख्य भूमिका आहे. नूलचे प्रा. मोहन तराळ, गडहिंग्लजचे झाकीर मुल्ला यांच्याही भूमिका आहेत. कॉ. अण्णा अन् फेरीवाले यांच्यातील नातेसंबंध कसे आहेत, हे या लघुचित्रपटावरून समजेल. अवघ्या २१ ते ३० वयोगटांतील युवकांनी ‘तरंग’ साकारला आहे.मोहित घाटगे (वय २१) याने ‘तरंग’ दिग्दिर्शित केला आहे. यापूर्वी त्याने लमाण जमातीची शिक्षणात होणारी परवड या संकल्पनेवर ‘लमाण’ हा लघुचित्रपट केला आहे. उजाड, कांदे-पोहे, तुझ्या-माझ्या प्रेमाचे, सिनेमावेडा या मोठ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात तो व्यस्त आहे.एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असणारा ऋतुराज जाधव (वय २६, रा. तिरवडे) हा डिप्लोमाधारक आहे. बारावीत शिकणारा देवेंद्र पिळणकर (आजरा), प्रोडक्शन मॅनेजर आहे. कन्नड चित्रपटातील युवा गायक ‘ओ-जीव’वे फेम अमित चौगुले (खणदाळ), अजिंक्य करतडकर यांचे संगीत व पार्श्वगायन आहे.मयूर कांबळे, कांतीलाल कांबळे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अवलोकन करणाऱ्या व नास्तिक असणाऱ्या मोहितच्या दिग्दर्शनाची ताकद इथे पाहावयास मिळते.अभिनेता संग्राम साळवी, रुंजी फेम धनश्री काडगावकर, किशोरी शहाणे, कन्नड साहित्यिक कारेश बस्तवाडे, मल्हार पाटेकर यांनी ‘तरंग’ला उत्कृष्ट प्रतिक्रिया दिल्या आहेत. डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पानसरे कुटुंबीयांशी चर्चा करून हा लघुचित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक मोहित घाटगे यांने व्यक्त केला.