शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे-दाभोलकर सुनावणी आता एकाच खंडपीठाकडे

By admin | Updated: April 6, 2016 23:52 IST

पानसरे-दाभोलकर कुटुंबीयांतर्फे विधिज्ञ अभय नेवगी यांनी दिलेल्या अर्जावर बुधवारी हा निर्णय झाला.

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या तपासासंबंधी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिका व सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेली याचिका आता एकाच खंडपीठासमोर चालणार आहे. पानसरे-दाभोलकर कुटुंबीयांतर्फे विधिज्ञ अभय नेवगी यांनी दिलेल्या अर्जावर बुधवारी हा निर्णय झाला. या तिन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी लवकर घ्यावी, यासाठी आज, गुरुवारी न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे.दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांतर्फे या दोन्ही हत्यांचा तपास जलदगतीने लागावा व त्यावर न्यायालयाचे नियंत्रण असावे यासाठी सुरुवातीला स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या; परंतु तपासात या दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने त्यांची एकत्रित सुनावणी सुरू झाली. केतन तिरोडकर यांनी पानसरे यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’मार्फत व्हावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यात पानसरे कुटुंबीयांनीही आपल्याला म्हणणे मांडू द्यावे, अशी विनंती न्यायालयास यापूर्वीच केली आहे.या तिन्ही याचिकांची सुनावणी एकाच खंडपीठाकडे व्हावी, अशी विनंती करणारा अर्ज बुधवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एच. वाघेला यांच्याकडे करण्यात आला. त्यांनी न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्याकडे या याचिका चालतील, असे स्पष्ट केले. आज, गुरुवारी या याचिकांची सुनावणी किती तारखेला होणार, यासंबंधी न्यायाधीशांकडे विनंती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)