शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे खटला सत्र न्यायालयाकडे वग

By admin | Updated: December 31, 2015 00:56 IST

सुनावणी १३ जानेवारीपासून : समीरची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावर्णी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णू गायकवाड याची सुनावणी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. यावेळी न्यायमूर्ती आर. डी. डांगे यांनी हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करीत असल्याचे समीरला सांगितले. त्यानुसार सत्र न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला दि. १३ जानेवारीला प्रारंभ होईल. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. या प्रकरणी त्याला म्हणणे मांडण्यासाठी १८ डिसेंबरची तारीख दिली होती; परंतु तांत्रिक बिघाडामुळे ही सुनावणी झाली नाही. बुधवारच्या सुनावणीसाठी समीरला न्यायालयात हजर करण्याची शक्यता होती; परंतु विधान परिषदेच्या मतमोजणीवरील बंदोबस्ताच्या कारणामुळे त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही.सी.)द्वारे घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती आर. डी. डांगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीरशी संवाद साधला. त्याला सुरुवातीला नाव विचारले. त्यानंतर तुझ्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ते ३९२ पानांचे असल्याने हा खटला या न्यायालयात चालू शकत नाही. त्यामुळे हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करीत असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. त्यावर समीरने ‘हो’ म्हणून उत्तर दिले. त्यानंतर न्यायमूर्ती डांगे यांनी सत्र न्यायालयात या खटल्याचा प्रारंभ १३ जानेवारी रोजी होईल, असेही सांगितले. समीर गायकवाड याच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांच्या न्यायालयात हा खटला तीन महिने चालला. या कालावधीत सुनावणीसाठी समीरला तीन वेळा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच हजर करण्यात आले. त्याच्या वकिलांनी सुनावणीसाठी समीरला हजर करा, असा न्यायालयास दोन वेळा विनंती अर्ज सादर केला होता; परंतु पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करीत त्याला हजर केले नव्हते. जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी पोलीस समीरला हजर करण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर साक्षीदारांना समन्स बजावून त्यांच्या साक्षी घेतल्या जातील. यावेळी सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा, समीरचे वकील अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन, अ‍ॅड. एम. एम. सुवासे उपस्थित होते. (प्रतिनिधी)