शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येशीही तावडेचा संबंध

By admin | Updated: June 12, 2016 01:44 IST

महत्त्वाचे पुरावे हाती : लवकरच ताबा घेऊन कोल्हापुरात आणणार : संजयकुमार

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेला हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याचा ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. ‘सीबीआय’चा तपास पूर्ण झाल्यानंतर पानसरे हत्येसंबंधी डॉ. तावडे याला ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एसआयटी) अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ‘एसआयटी’ पथकाने सांगली येथील ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याला अटक केली. गायकवाड याचा दाभोलकर हत्येशी काही संबंध आहे का, यासंबंधी ‘सीबीआय’च्या पथकाने त्याच्याकडे सखोल चौकशी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तिन्ही तपास यंत्रणांद्वारे सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे. ‘सीबीआय’च्या पथकाने शुक्रवारी (दि. ११) रात्री दाभोलकर हत्याप्रकरणी संशयित डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केल्याने देशभरात खळबळ उडाली. तावडे याचे आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन ‘सीबीआय’च्या तपासामध्ये पुढे आल्याने त्याचा पानसरे हत्येशी काही संबंध आहे का, यासंबंधी ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘ डॉ. तावडे याचा पानसरे हत्येशी संबंध असल्याचे काही पुरावे हाती लागले आहेत. डॉ. दाभोलकर, पानसरे व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासावर आम्ही तिन्ही तपासयंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहोत. पानसरे हत्येसंबंधी डॉ. तावडे याच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी करणार आहोत. प्रसंगी न्यायालयाच्या परवानगीने त्याचा ताबा घेऊन कोल्हापुरात तपासकामासाठी फिरविणात येईल.’’