शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यात शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारात

By admin | Updated: June 5, 2015 00:20 IST

शाळांच्या संख्येत वाढ : पटपडताळणीमुळे शिक्षक अडकले कात्रीत

किरण मस्कर - कोतोली -ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळांचे निकाल मिळाल्यानंतर माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी आता आपल्या शाळांना विद्यार्थी मिळावेत, यासाठी विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे.विनाअनुदानित शाळांची संख्या ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गावागावांत शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे शिक्षकांवर पालकांचे उंबरठे झिजवून विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. आपल्या शाळेत विद्यार्थी आल्यानंतर त्यांना विविध सुविधा देणार आहे, अशी आमिषे शिक्षक पालकांना दाखवीत आहेत, तर जी शाळा पाल्याला जास्त सेवा-सुविधा देईल, अशा शाळेत मुलांना पाठविण्याची पालकांची मानसिकता आहे.गत वर्षात अनेक विनाअनुदानित शाळांना परवानग्या देण्यात आल्या. राजकारणातून एका-एका गावात दोन-दोन शाळा स्थापन करण्यात आल्या आणि प्रश्न निर्माण झाला विद्यार्थ्यांचा. याचा परिणाम म्हणून संस्थाचालकांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत फिरविण्यास सुरुवात केली. यामुळे आपली नोकरी टिकून राहावी, यासाठी शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली. सरकारने सुरू केलेल्या पटपडताळणीमुळे तर शिक्षकवर्ग मोठ्या कात्रीत सापडला आहे. विद्यार्थीसंख्येवर घालण्यात आलेली बंधने, अतिरिक्त तुकड्यांचा प्रश्न, पटपडताळणी करून तुकड्या कमी कशा होतील यासाठी शिक्षण विभागाने चालविलेली धडपड, यामुळे तुकड्या कमीची टांगती तलवार असून, शिक्षकाची नोकरी म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. याचा परिणाम शिक्षकांना मिळालेली उन्हाळ्याची सुटी या शिक्षकांनी आता विद्यार्थी मिळविण्यासाठी खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम शाळा-शाळांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे. एकदा विद्यार्थीसंख्या पूर्ण झाली की, पुढील तीन वर्षे तुकडीला कोणतीच अडचण येणार नाही. यासाठी शिक्षक साम, दाम, त्याचबरोबर राजकीय दबावतंत्र वापरत असल्याचे गावागावांत पाहावयास मिळत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, पुस्तके, वह्या, एस. टी. पास, फीमध्ये सवलत, छत्र्या, रेनकोट, आदींची आमिषे दाखविली जात आहेत. काही ठिकाणी पालकांना जेवणावळी लावून पाल्यांना आपल्या शाळेत पाठविण्याचा नवा फंडा ग्रामीण भागात तयार झाला आहे. काही पालकांनी या प्रकाराला नापसंती दाखविली आहे. तसेच शाळेची पात्रता तपासूनच आम्ही आमच्या पाल्यांना कोणत्या शाळेत पाठवायचे ते ठरविणार आहे.- शिवाजी आनंदा जाधव, पालक (कोलोली).