कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सतरा वर्षीय जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळा पब्लिक स्कूलने संजीवन स्कूलचा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या या सामन्यात पन्हाळा पब्लिक स्कूलने ३-० अशा गोलफरकाने संजीवन स्कूलवर मात केली. सामन्यात अनिकेत कदमने दोन, तर निखिल जाधवने एक गोल केला. संपूर्ण सामन्यात पन्हाळा पब्लिक स्कूलचेच वर्चस्व होते. विजयी संघास संस्था अध्यक्ष संदीप नरके यांचे प्रोत्साहन व प्रशिक्षक संग्राम गावडे, क्रीडाशिक्षक महेश जाधव, संघव्यवस्थापक दीपक पाटील, प्राचार्य अल्बर्ट सर, उपप्राचार्या मर्लिन यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
पन्हाळा पब्लिक स्कूल अजिंक्य
By admin | Updated: August 25, 2014 23:11 IST