शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

‘पंचगंगा’ पुन्हा पात्रात

By admin | Updated: July 18, 2016 01:09 IST

जिल्ह्यात रिमझिम : गगनबावड्यात ०६.५० मि.मी.; राधानगरी धरण ८३ टक्के भरले

कोल्हापूर : सलग चौथ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पातळी ७ फूट ४ इंचांनी उतरून गेल्या अनेक दिवसांपासून पात्राबाहेर असलेले पाणी रविवारी पुन्हा पात्रात गेले. उघडीप असली तरी जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू राहिली. राधानगरी धरणसाठ्यात वाढ होऊन ते ८३ टक्के भरले असून, राजाराम बंधाऱ्याची पातळी ३१ फूट २ इंच इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६.५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नदीच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन ते गेल्या चार दिवसांपासून शहरातील नदी घाट परिसरातील कै. संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्यासमोर होते. परंतु रविवारी पावसाचा जोर कमी राहिल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत घट होऊन ते पुन्हा पात्रात गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. शहरासह जिल्ह्णात दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी रिमझिम सुरूच राहिली. ढगाळ वातावरणाने हवेत गारवा जाणवत होता. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी राहिला असला तरी धरणसाठ्यात मात्र वाढ झाली. राधानगरी धरण ८३ टक्के भरले आहे. त्या खालोखाल वारणा ६६ टक्के, तुळशी ५६, दूधगंगा ४४, कुंभी व कासारी ८१, जांबरे ९७, कडवी व घटप्रभा १०० टक्के इतका धरणसाठा आहे. शनिवारी पाण्याखाली असलेल्या २१ बंधाऱ्यांपैकी ९ बंधारे रविवारी वाहतुकीस खुले झाले असून, अद्याप पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे ७ बंधारे आणि भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे हे ४ बंधारे व वारणा नदीवरील तांदूळवाडी असे १२ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्णात गेल्या चोवीस तासांत २१.१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ४हातकणंगले - ०.०० ४शिरोळ - ०.०० ४पन्हाळा - ०१.५७ ४शाहूवाडी - ०५.५० ४राधानगरी - १.१७ ४गगनबावडा - ०६.५० ४करवीर - ०.०९ ४कागल - ०.२८ ४गडहिंग्लज - ०.०० ४भुदरगड - १.०० ४आजरा - २.२५ ४चंदगड - २.८३.