शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

पंचायत समिती देशात अग्रेसर करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 22:09 IST

हसन मुश्रीफ : एकदा सत्ता द्यावी; वंदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा

कागल : कागल तालुक्यातील जनतेने जेथे मला संधी दिली तेथे मी त्या संधीचे सोने करीत सामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. इतरांपेक्षा सरस काम करून दाखविले आहे. आता एकदा ही पंचायत समितीची सत्ता माझ्याकडे द्या; कागलची पंचायत समिती देशात अग्रेसर केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. वंदूर (ता. कागल) येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासो घाटगे होते. यावेळी उमेदवार रमेश तोडकर, धनाजीराव घाटगे, केरबा चौगुले, तानाजी बागले, वसंतराव पाटील, बाबूराव हांचनाळे, पारिसा जंगटे, बबन खोडवे, डॉ. रणदिवे, आदी उपस्थित होते. ‘कर्जमाफी’ची लढाई लढल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांचा यावेळी सत्कार झाला. आमदार मुश्रीफ म्हणाले की, निवडून दिलेले उमेदवार तुम्ही कोठे पाहिलेत का? एकदा निवडून गेले की फिरकायचेच नाही, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे आता वंदूरकरांनी सावधपणे मतदार करावे, आम्हाला सत्ता आमच्या घरात पद ठेवण्यासाठी नको आहे. आजवर जे काही मिळाले ते कार्यकर्ते आणि जनतेला मानसन्मान देण्यासाठीच उपयोगी आणले आहे. निराधार योजना, मोफत आॅपरेशन, मुबलक रेशनधान्य, रुग्णवाहिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगार निर्मिती, अशी कितीतरी कामे केली ते सांगू शकतो. मात्र ३५ वर्षे पंचायत समिती ताब्यात असणाऱ्या संजय घाटगेंनी काय केले? याचा जाब तुम्ही विचारला पाहिजे. मी आणि माझे उमेदवार आणि शिवसेना व भाजपचे उमेदवार याची तुलना करा, यावेळी स्वागत उत्तम कांबळे यांनी, प्रास्ताविक कुंडलिक खोडव यांनी, तर आभार एम. एस. कांबळे यांनी मानले. (प्रतिनिधी)व्हनाळीला सहली काढाआमदार मुश्रीफ म्हणाले की ३५ वर्षे संजय घाटगे यांच्याकडे पंचायत समितीची सत्ता आहे. पण त्यांचे गाव असणारी व्हन्नाळी अजूनही आदिवासी गावासारखीच दिसते. एक निष्क्रीय लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निष्क्रियतेचा पुरावा पाहण्यासाठी आता व्हन्नाळीला सहली काढा.