शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘नगरोत्थान’चा आयुक्तांकडून पंचनामा

By admin | Updated: January 9, 2015 00:07 IST

रहदारीच्या रस्त्यांंना प्राधान्य : निकृष्ट कामे करणाऱ्यांना अद्दल

कोल्हापूर : शहरात पावणेदोनशे कोटी रुपयांच्या सुरू असलेल्या नगरोत्थान योजनेतील रस्ते व पावसाळी पाणी नियोजन कामाच्या सद्य:स्थितीबाबत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, बुधवारी आढावा बैठक घेतली. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या रस्त्यांची प्राधान्याने डांबरीकरणासह सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी ठेकेदारांसह महापालिकेचे सर्वच अधिकारी उपस्थित होते.राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यावरील पावसाळी पाण्याच्या निर्गतीसह युटिलिटी शिफ्टिंगची कामे त्वरित व दर्जेदार करण्याबाबत आर. ई. इन्फ्राच्या प्रतिनिधींना सक्त सूचना देण्यात आल्या. आयसोलेशन रुग्णालय ते गोकुळ हॉटेल दरम्यानच्या रस्त्याचे ठेकेदार शिवपार्वती कन्स्ट्रक्शन हे पावसाळ्याच्या पाणी नियोजनासाठी निकृष्ट दर्जाच्या पाईप वापरत असल्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. निविदेत ठरल्याप्रमाणेच पाईप वापराव्या लागतील, अशी सक्त सूचना ठेकेदारास करून याबाबत नोटीसही बजावण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले. नगरोत्थान योजनेतील रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सर्वच ठेकेदारांनी दिली. आयुक्तांनी सर्वच बाजूंची उलटतपासणी करीत कामाच्या दर्जाबाबत आग्रही असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी कामातील दर्जाबाबत तडजोड केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट बजावले. आयुक्तांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांची गाळण उडाली. यावेळी नूतन कार्यकारी अभियंता एस. के. माने, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, सहायक अभियंता एन. एस. पाटील, आदींसह ठेकेदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)