शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेचे ‘दुखणं’ बळावतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:43 IST

कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के ...

कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के भागात अद्याप भूमिगत मैला सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. परिणामी रस्त्याकडेच्या गटारीतून, विविध नाल्यांतून हे मैलामिश्रित सांडपाणी शेवटी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढलेली आहे. त्याचा परिणाम कोल्हापूरच्या शहरवासीयांना भोगावा लागत नसला तरी नदीच्या खालच्या बाजूंकडील नागरिक मात्र त्रस्त आहेत.नागरिकांचे आरोग्य धोक्यातपंचगंगा नदीचे प्रदूषण ही एक चिंतेची बाब बनली आहे. अनेक ठिकाणांहून थेट पंचगंगा नदीत मैला व रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरोळ तालुक्यात तर कर्करोगाचे रुग्ण आढळून येत आहेत, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यात कोल्हापूर महानगरपालिकेचा वाटा मोठा आहे. नदी प्रदूषणप्रकरणी पालिकेला शेकडो शो कॉज नोटीस बजावल्या, गुन्हे दाखल झाले, उच्च न्यायालयाने फटकारले, राष्टÑीय हरित लवादाने दंड ठोठावण्याचा इशारा दिला. तरीही प्रदूषण रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे जयंती व दुधाळी नाल्यांवर सांडपाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तरीही अनेकवेळा हे नाले ओसंडून वाहून थेट नदीत मिसळतात.त्याला तांत्रिक कारणे पुढे केली जातात. लाईन बझार येथे७६ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले असले, तरी त्याकडे ७५ एमएलडी सांडपाणी दिले जात नाही. जेमतेम ५० ते ५५ एमएलडी सांडपाणी तेथे पोहोचते. बाकी २० ते २५ एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते.शहरात लक्षतीर्थ, फुलेवाडी, जामदार क्लब, पिकनिक पॉइंट, जुना बुधवार, रमणमळा, शुगर मिल, छत्रपती कॉलनी, बापट कॅम्प, राजहंस प्रेसनजीक, सीपीआर असे १२ छोटे मोठे नाले असून ते अडविणे आणि एस.टी.पी.कडे वळविणे यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे; परंतु ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते आहे. यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.