शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:43 IST

शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी ...

शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुन्हा धास्ती घेतली आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे कृष्णेची पाणी पातळी ४० फूट, राजापूर बंधाऱ्यावर २५.३ फूट, अंकली पुलाजवळ २३.८ फूट होती तर शिरोळ बंधाºयावर पंचगंगेची पाणी पातळी ३८.९ फूट, तेरवाड बंधाºयावर ४९ फूट होती.गतमहिन्यात महापुराने धुमाकूळ घातल्याने शेती, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापूर ओसरून जनजीवन सुरळीत होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले आहे. तेरवाड, शिरोळ बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. कुरुंदवाड-जुना शिरोळ रस्त्यावरील अनवडी पूल पाण्याखाली गेला. कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.पन्हाळा परिसरात पुन्हा संततधारपन्हाळा : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पन्हाळा तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याने सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाºया भाज्याही मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी, जांभळी, कासारी, धामणी आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाऊस थांबला नाही तर अनेक बंधारे पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पन्हाळ्यावर २७ मिमी, तर बाजारभोगाव येथे सगळ्यात जास्त ५४ मिमी पावसाची नोंद झाली.कासारी खोºयात पावसाचा जोरअणूस्कुरा : कासारी खोºयात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पाल बंधाºयावर पाणी आल्याने पाल, इजोली, सावर्डी, मरळे, बर्की गावांचा संपर्क तुटला आहे. करंजफेण परिसरात गेले तीन दिवस पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारनंतर करंजफेण ते पालदरम्यान बंधाºयावर पाणी आल्याने नदीपलीकडच्या नागरिकांची तारांबळ उडाली. बर्की येथील बंधाºयावर पाणी आल्याने धबधब्याकडे जाणारे पर्यटकही मागे परतल. तर दुपारनंतर परिसरांतील शाळांना सुटी दिली. दरम्यान, गेल्या महापुराचा अनुभव ताजा असल्याने नागरिक आताच जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करत आहेत.