शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचगंगा’ प्रदूषण शिरोळच्या मुळावर

By admin | Updated: November 17, 2015 00:25 IST

नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीही बिघडली

संदीप बावचे --जयसिंगपूर -‘नेमीचे येतो पावसाळा’ याप्रमाणे प्रत्येक निवडणुकामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात प्रत्येकवेळी पंचगंगा प्रदूषण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, हे आश्वासनच राहिले आहे. अनेक वर्षांपासून नदी क्षेत्रात वाढलेले औद्योगिकरण, शहरातील सांडपाणी यामुळे पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा शिरोळकरांना भोगावी लागत आहे.पंचगंगा नदीमुळे तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, धरणगुत्ती, आगर, कुरूंदवाड, शिरोळसह सुमारे २३ गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती सुजलाम-सुफलाम् बनली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावात औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगिकरणाचे, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे जलचर प्राणी नाश पावत असल्याने प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाऱ्यावर येऊन तटत असल्याने याचा फटका गेली अनेक वर्षे तालुक्यालाच जास्त बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेच. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे. दरवर्षी आॅक्टोबरनंतर दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासन पातळीवर अनेक वेळा आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडल्याने पंचगंगा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे. नदीला काळेकुट्ट पाणी आले. पाण्याला उग्र वास सध्या येत असून नदीपात्रात अक्षरश: मृत माशांचा थर पडला होता. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. (पुर्वार्ध)