शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सराफ व्यवहारात ‘पॅन कार्ड’ सक्ती त्रासदायक

By admin | Updated: January 20, 2016 01:04 IST

दोन लाखांच्या खरेदीसाठी पॅन कार्ड गरजेचे : सुमारे ८० टक्के ग्राहकांकडे कार्ड नसल्याने अडचण, व्यवसायावर परिणाम

 कोल्हापूर : दोन लाख रुपयांवरील सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी पॅन कार्ड क्रमांक देण्याची सक्ती सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांना त्रासदायक ठरणारी आहे. सोने-चांदीची खरेदी करणाऱ्या सुमारे ८० टक्के ग्राहकांकडे पॅन कार्ड नसल्याने खरेदीचा व्यवहार करणे अडचणीचे ठरत आहे. अशा स्थितीत सर्वांना पॅन कार्ड दिल्याशिवाय केंद्र सरकारने व्यवहारात पॅन कार्ड क्रमांक देण्याची सक्ती करू नये, अशी मागणी सराफ व्यावसायिकांतून होत आहे. यासाठी आॅल इंडिया जेम्स अ‍ॅँड ज्वेलरी फेडरेशन व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे.गेल्यावर्षी केंद्र सरकारने दोन लाख रुपयांवरील सोने-चांदी खरेदीसाठी पॅन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निर्णयाचे तोटे अधिक आहेत. देशातील सुमारे ८० टक्के व्यक्तींकडे अजून पॅन कार्ड नाहीत. ते लक्षात घेता, या निर्णयामुळे शेतकरी अथवा पॅन कार्ड नसलेल्या व्यक्तींना दोन लाखांवरील सोने-चांदीची खरेदी करणे त्रासदायक ठरणार आहे.या निर्णयामुळे व्यवसाय कोलमडण्याची भीती सराफ व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)दोन लाखांवरील खरेदीसाठी ग्राहकांकडून पॅन कार्ड क्रमांक, फॉर्म नंबर ६० व ६१ भरून घ्यावेत. तसेच सहा वर्षे हे रेकॉर्ड सांभाळावे, असे जाचक निर्णय सरकारने घेतले असून, ते ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांना त्रासदायक ठरणारे आहे. त्याविरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांत आॅल इंडिया जेम्स अ‍ॅँड ज्वेलरी फेडरेशन व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाची मुंबईत बैठक होईल. तेथील निर्णयानुसार संबंधित जाचक निर्णयांविरोधात लढा दिला जाईल. दोन लाखांवरील खरेदीसाठी पॅन कार्ड क्रमांक घेण्याचा निर्णय चांगला आहे; पण सरकारने पहिल्यांदा सर्वांना पॅन कार्ड द्यावे. त्यानंतरच संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे.- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघखासदारांना आज निवेदन देणारशेतीमालाला आयकर लागू नसल्याने शेतकरीवर्ग पॅन कार्ड काढत नाहीत. अनिवासी भारतीयांकडेही पॅन कार्ड असत नाही. यामुळे पॅन कार्ड नसलेल्या व्यक्तीला सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे किंवा सराफाकडून विकले जाणे यावर बंधन आले असल्याचे कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाचे सचिव कुलदीप गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारने संबंधित निर्णय घेतला असल्याने त्याविरोधात संसदेत आवाज उठणे आवश्यक आहे. त्यामुळे संघातर्फे आज, बुधवारी दुपारी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन दिले जाणार आहे.