शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे संशोधक वरद गिरी यांचे पालीला नाव

By admin | Updated: September 27, 2016 00:42 IST

नव्या पालीचा शोध : मध्य, पश्चिम भारतात अधिवास; देशात साधारण २९० प्रजाती

गजानन दिवाण -- औरंगाबाद -मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले असून, या पालीला ‘सिर्टोडक्टलस वरद गिरी’ असे मराठी नाव देण्यात आले आहे. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील अमरावती, चंद्रपूर परिसरात ही पाल सापडते. तब्बल १३० वर्षांनंतर देशात या पालीचे दर्शन झाले आहे. अमेरिकेतील व्हिलनोव्हा विद्यापीठातील डॉ. इशान अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात बंगलोरयेथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेस’चे झिशान मिर्झा, अनुराग मिश्रा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सौनक पाल आणि व्हिलनोव्हा विद्यापीठातील डॉ. अरुण बौर यांच्या पथकाने तब्बल सहा वर्षे या पालीचा अभ्यास केला. शुक्रवारी यासंदर्भातील पेपर ‘झुटाक्सा’ या सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही पाल सहा सेंटिमीटरपर्यंत वाढते. विशेषत: जंगलात आढळणारी ही पाल दिवसा पाला-पाचोळा किंवा दगडाखाली राहते आणि केवळ रात्री बाहेर पडते. ही पाल पावसाळ्यातच ब्रीडिंग करते. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील एका परिसरात या पालीची नोंद झाली आहे. जगभराचा विचार केल्यास पालीची ही पोटजात आग्नेय आशिया, श्रीलंका आणि भारतात सापडते. देशात पालीच्या साधारण २९० प्रजाती आढळतात. या नव्या संशोधनाने यात आणखी एकाची भर पडली असल्याची प्रतिक्रिया बंगलोरयेथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेस’चे वरद गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली. मराठी नावच का?कोल्हापूर जिल्ह्यातील राजगोळी या गावात जन्मलेल्या वरद गिरी यांच्या नावाने या पालीचे बारसे करण्यात आले आहे. गिरी सध्या बंगलोरयेथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसमध्ये कार्यरत असून, सरपटणाऱ्या प्राण्यांवर गेल्या २० वर्षांपासून ते संशोधन करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत ३५ प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांचे नाव या पालीला देऊन त्यांच्या कार्याला या संशोधकांनी सलाम केला आहे. याआधीही जर्मनीच्या संशोधकाने शोधलेल्या सापाला आणि पश्चिम घाटात एका पालीला वरद गिरी यांचे नाव देण्यात आले आहे.