शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पेंटरला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. ओंकार ...

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पेंटरला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. ओंकार धोंडी खोचरे (वय २४, रा. छत्रपती कॉलनी, मुडशिंगी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री दौलतनगरात गोखले विद्यालयानजीक घडली.

ओंकार खोचरे हे पेंटिंग काम करतात. रोज सकाळी दौलतनगर येथे एकत्र येऊन तेथून सर्व सहकारी एकोप्याने कामावर जात होते. शनिवारी सायंकाळी खोचरे हे कामावरून परतले. त्यानंतर ते मित्र सिद्धार्थ शेळके याच्यासह पायी शाहूनगरातील कामावर जात होते. त्यावेळी माउली पुतळा परिसरात त्याला संशयित सचिन संजय कोल्हे (२२, रा. दौलतनगर) याने अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने नकार देताच कोल्हे याने त्याच्या कानशिलात लगावली. हातातील कडे त्याच्या डोक्यात मारून लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. हल्ल्यात खोचरे गंभीर जखमी झाले. सिद्धार्थ शेळके व अनिकेत मांगले या दोघांनी खोचरे याची त्याच्या तावडीतून सुटका केली. त्याला जखमी अवस्थेत सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात सचिन कोल्हे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.