शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

पाडवा, भाऊबीज खरेदीची उलाढाल कोटीत

By admin | Updated: November 14, 2015 00:30 IST

सोन्याला मागणी : मोबाईल, एलसीडी, आदींची मोठ्या प्रमाणात विक्री; गर्दीमुळे शहरातील वाहतुकीवरही ताण

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १२) व भाऊबिजेनिमित्त शुक्रवारी सोने-चांदी, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली़ आकर्षक योजना, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि कर्जसुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा यथेच्छ आनंद लुटला़ यंदा दिवाळी पाडव्याच्या खरेदीवर मोहोर उमटविली ती मोबाईल, सोने बाजारपेठेने़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ६० टक्क्यांची वृद्धी या बाजारपेठेने नोंदविल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़; कारण सोन्याच्या दर २६ हजार १००च्या आसपास पोहोचला होता. होम अप्लायसेन्स, सोने-चांदी बाजार तसेच मोबाईल शॉपी गर्दीने फुलल्या होत्या़ सकाळपासूनच ग्राहकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही प्रचंड ताण पडला़ ग्राहकांनी अक्षरश: रांगा लावून खरेदी केली़; इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत टीव्ही, एलईडी, होम थिएटर, सीडी प्लेयर तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन, फ्रीज या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती़ महापालिका निवडणुकीमुळे थंडावलेली बाजारपेठ दिवाळी सुरू होताच पुन्हा तेजीच्या शिखरावर पोहोचली़ शहरातील बहुतांश इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून शोरूममध्ये शून्य टक्के व्याजदर आणि प्रथमच झिरो डाउन पेमेंटवर खरेदीची आॅफर देण्यात आली होती़ ग्राहकांनी या योजनेचा पुरेपूर फायदा घेतला़ सोनी, एलजी, सॅमसंग, व्हिडीओकॉन, पॅनासॉनिक, गोदरेज या कंपन्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी होती़ विविध नामांकित कंपन्यांच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीन्सनाही चांगली मागणी होती़ विविध फायनान्स कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी झिरो डाउन पेमेंट, एक्स्ट्रा वॉरटी आॅफर, लकी ड्रॉ, अशा क्लृप्त्या वापरून ग्राहकांना आकर्षित केले़ इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी टेंबे रोड, शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार येथील शोरूम्स गर्दीने फुलली होती.‘एलईडी’च्या विविध श्रेणी साडेसात हजारांपासून ते २० लाख, फ्रिज १० हजार ते १़५० लाख, वॉशिंग मशीन साडेचार हजार ते २० हजार, मायक्रोवेव्ह ओव्हन सात ते २५ हजार, तसेच होम थिएटर सहा हजार ते अडीच लाखांपर्यंत उपलब्ध आहेत़ बाजारातील स्पर्धेमुळे तसेच झिरो डाउन पमेंट योजनेमुळे किंमतलाभाचा फायदा ग्राहकांना होत आहे़ त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन यांच्या खरेदीला ग्राहकांनी पहिली पसंती दिली, अशी माहिती सिद्धी होम अप्लायन्सेसचे सचिन मांगले यांनी दिली.सॅमसंग, मोटोरोला, जीओनी, पॅनोसोनिक, इंटेक्स, लिनोव्हा, सोनी, व्हिवो,ओपो, आदी कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना जास्त मागणी होती़ गतवर्षीच्या तुलनेत या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या विक्रीमध्ये सरासरी ६० टक्क्यांची वृद्धी झाली़ सॅमसंग, जिओनी, सोनी, इंटेक्स, लिनोव्हा, ओपो या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना चांगली मागणी होती़ सोनीचे अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्स १२ ते ४७ हजार, इंटेक्स ४ ते १५ हजार, लिनोव्हा ८ ते १५, तर सॅमसंग साडेपाच ते ४० हजार, जिओनी ५ ते ३० हजारांमध्ये उपलब्ध आहेत. बेसिक अ‍ॅप्लिकेशन्सच्या तुलनेत अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनची सुविधा असलेल्या मोबाईल्सनाही मोठी मागणी होती. शालेय मुलांनीही अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या खरेदीला पसंती दिली़ अगदी २२५० पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. ओपो, सॅमसंग, लिनोव्हा या कंपन्यांच्या मोबाईलना ग्राहकांची पहिली पसंती होती, अशी माहिती म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअरचे प्रवीण मोहिते यांनी दिली.दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या खरेदीचा वेगही मोठा होता. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी खरेदी केल्या; तर चारचाकी गाड्यांमध्ये ग्राहकांची पहिली पसंती राहिली ती मारुती सुझुकीच्या फॅमिली कारना. यात वॅगन आर, सिनोरा या गाड्यांना ग्राहकांनी मोठी पसंती दर्शविली होती. कोल्हापुरातील चारचाकी गाड्यांच्या विक्रीत ७५ टक्के वाटा मारुतीच्या विविध मॉडेल्सचा होता, अशी माहिती साई सर्व्हिसचे सेल्स मॅनेजर आदिनाथ पाटील यांनी दिली. लकी ड्रॉ, खरेदीवर बक्षीस, सुवर्ण भिशी यासारख्या योजनांमुळे सोने-चांदीच्या बाजारपेठेला चांगला प्रतिसाद लाभला़ अंदाजे २० ते ३० कोटी रुपयांची उलाढाल या बाजारपेठेत झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कमी वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीवर महिलांचा जास्त कल राहिला़ गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली़ सोन्याची नाणी, दागिने, आदींच्या खरेदीसाठी सकाळी दहापासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती़, अशी माहिती महेंद्र ज्वेलर्सचे भरतभाई ओसवाल यांनी दिली. (प्रतिनिधी)मोबाईल ७४ हजार रुपयांपर्यंतसॅमसंग, मोटोरोला, जीओनी, पॅनोसोनिक, इंटेक्स, लिनोव्हा, सोनी, व्हिवो, ओपो, आदी कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना जास्त मागणी होती़ गतवर्षीच्या तुलनेत या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या विक्रीमध्ये सरासरी ६० टक्क्यांची वृद्धी झाली़ सॅमसंग, जिओनी, सोनी, इंटेक्स, लिनोव्हा, ओपो या कंपन्यांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सना चांगली मागणी होती़ सोनीचे अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्स १२ ते ४७ हजार, इंटेक्स ४ ते १५ हजार, लिनोव्हा ८ ते १५, तर सॅमसंग साडेपाच ते ४० हजार, जिओनी ५ ते ३० हजारांमध्ये उपलब्ध आहेत. बेसिक अ‍ॅप्लिकेशन्सच्या तुलनेत अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनची सुविधा असलेल्या मोबाईल्सनाही मोठी मागणी होती. शालेय मुलांनीही अ‍ॅँड्रॉईड मोबाईल्सच्या खरेदीला पसंती दिली़ अगदी २२५० पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. ओपो, सॅमसंग, लिनोव्हा या कंपन्यांच्या मोबाईलना ग्राहकांची पहिली पसंती होती, अशी माहिती म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअरचे प्रवीण मोहिते यांनी दिली.