शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

एसआरटी पद्धतीने फुलविली भातशेती

By admin | Updated: September 6, 2015 22:46 IST

नवीन तंत्रज्ञानाने चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील अनंत कांबळी यांनी भातशेती केली आहे.

उत्तमकुमार जाधव-चिपळूण कोकणात भातशेतीवरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो. शेतीमध्ये सध्या आधुनिक तंत्रप्रणाली विकसित झाली आहे. चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील आंबा बागायतदार व प्रगतशील शेतकरी अनंत बाबाजी कांबळी यांनी एसआरटी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन एक एकर क्षेत्रामध्ये भातशेती फुलविली आहे. सध्या भातशेतीवर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ लागला आहे. शेतीच्या मशागतीसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. परंतु, पारंपरिक शेती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आजही शेतीसाठी काबाडकष्ट करीत आहे. चिपळूण तालुक्यातील पाचाड येथील प्रगतशील शेतकरी अनंत कांबळी यांनी आंबा, काजू तसेच भातशेतीत आधुनिक पद्धतीचा उपयोग करुन एक एकर जमिनीमध्ये भात लागवड केली आहे. सगुणा राईस यंत्र हे भातशेतीशी संबंधित उकळणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरुपी गादी वाफ्यावर (पुढील १० वर्षे उकळणी, चिखल न करता) टोकणणी करुन भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. या पिकावर रब्बी हंगामातील अन्य पिकेही घेता येऊ शकतात. पावसाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले तरी भाताचे उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त येते. पावसाचे प्रमाण चालू हंगामात निम्म्यापेक्षा कमी असूनही कांबळी यांनी या पद्धतीचा उपयोग करुन उत्तम प्रकारे भातशेती फुलवली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना भातलावणी योग्य पध्दतीने करता आली नाही. जी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, अशी शेती शेतकऱ्यांनी न लावता ओसाड सोडली आहे. काही शेतकऱ्यांनी पंपाच्या सहाय्याने भातलावणी केली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भविष्यात भातपिकासाठी एसआरटी या पद्धतीचा उपयोग करुन कमी प्रमाणात झालेली भातशेती या नवीन पद्धतीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. या नवीन तंत्रज्ञानाच्या भातशेतीची पाहणी कर्जत (जि. रायगड) येथील कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी केली आहे. कृषीवसंत शेतकरी संघाचे सहकार्य तसेच चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. सरतापे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, मार्गताम्हाणेचे मंडल कृषी अधिकारी ए. बी. पाटील, कृषी पर्यवेक्षक ए. एस. मिरगावकर, कृषी सहाय्यक एस. एन. धायगुडे, कृषी सहाय्यक मनोज गांधी आदींच्या मार्गदर्शनाखाली कांबळी यांनी एसआरटी पद्धतीचा प्रयोग केला आहे.