शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

‘पी. एन.’ सांगतील तोच जिल्हाध्यक्ष

By admin | Updated: April 1, 2016 01:24 IST

निवड लांबणीवर : सोनियांच्या दौऱ्यानंतर निर्णय

कोल्हापूर : कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी पी. एन. पाटील यांच्या सहमतीशिवाय निवड करणे तितकेसे सोपे नाही. इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असली तरी पाटील यांचे आजपर्यंतचे कॉँग्रेस पक्षातील वजन व निष्ठा पाहता ते सांगतील तोच जिल्हाध्यक्ष होणार, हे नक्की आहे.दहा वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष या पदांवर राहिलेल्यांना बदलण्याची प्रक्रिया कॉँग्रेसमध्ये सुरू आहे. पी. एन. पाटील व प्रल्हाद चव्हाण हे गेली १७ वर्षे पदावर कार्यरत आहेत. पाटील यांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता जिल्हा परिषद, जिल्हा बॅँक, गोकुळ, महापालिकेमध्ये कॉँग्रेसने पकड कायम ठेवल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर बदल करू नये, अशी प्रमुख पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. बदल होणार म्हणून इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असून, प्रकाश आवाडे यांनी तशी उघड मागणी केली आहे. आमदार सतेज पाटील यांनी आवाडे यांना शब्द दिला असला तरी ते स्वत: इच्छुक असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष या पदांत बदल करायचा झाल्यास पी. एन. पाटील यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी ११ एप्रिल रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या तयारीसाठी प्रदेश कॉँग्रेस व्यस्त आहे. अशा गडबडीत बदलाचा निर्णय होणार नाही; त्यामुळे सोनियांच्या दौऱ्यानंतरच अध्यक्ष बदल होण्याची शक्यता आहे.अनपेक्षित नाव पुढे येणार!चार वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष निवडीवेळी माजी आमदार संजय घाटगे यांचे नाव पी. एन. पाटील यांनी पुढे आणले. ही निवड वादग्रस्त ठरल्याने ती रद्द केली. यावेळीही बदल करायचा ठरविले तर पाटील अनपेक्षित नाव पुढे करण्याची शक्यता आहे. पक्षाने अद्याप माझ्याकडे राजीनामा मागितलेला नाही. जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चा प्रसारमाध्यमांतूनच वाचीत आहे. १७ वर्षे काम केल्याने जिल्हाध्यक्ष पदावरून स्वत:हून बाजूला होण्याची तयारी आहे. गेली २७ वर्षे कॉँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. बदल करणार असतील तर हरकत नाही. - पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस