शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’ अध्यक्षपदी पी. एन. पाटील निश्चित

By admin | Updated: May 8, 2017 01:04 IST

‘भोगावती’ अध्यक्षपदी पी. एन. पाटील निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कराशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदासाठी माजी आमदार पी. एन. पाटील यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी उपाध्यक्षपदी कोण याचीच चर्चा भोगावती परिसरात सुरू आहे. उद्या, मंगळवारी ‘भोगावती’च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची निवड होत आहे.भोगावती कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाले. संचालक मंडळाच्या सर्व एकवीस जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून काँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू शेतकरी सेवा पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना, भाजप, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र महाआघाडीस सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. साहजिकच विजयी पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यावर सभासद शेतकऱ्यांनी मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे ‘भोगावती’च्या नूतन अध्यक्षपदी त्यांचे नाव निश्चित मानले जाते. मात्र, उपाध्यक्षपदी कोण याचीच भोगावती परिसरात चर्चा चालू आहे.संभाव्य उपाध्यक्ष पदासाठी अनुभवी संचालकांची नियुक्ती होणार की, नवीन चेहऱ्याला पसंती मिळणार, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. एकीकडे भोगावती वाचविण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी अनुभवाला प्राधान्य मिळणार की नवीन कार्यकर्ता तयार करणार, याकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.कर्जाच्या खाईत रुतलेल्या भोगावतीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे शिवधनुष्य या संचालक मंडळास पेलावे लागणार आहे. त्यामुळे पी. एन. पाटील यांना वेळ देणाऱ्या सहकाऱ्याची निवड करावी लागणार आहे. सहकारातील जाणते नेतृत्व म्हणून आताच्या संचालक मंडळात आठ संचालक आहेत, तर उर्वरित संचालकांपैकी अनेकांनी आपल्या संस्था चांगल्या चालवून परिसरात आदर्श निर्माण केला आहे. याबरोबर या संचालक मंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने सभासदांनीही आपल्या मताचे दान पी. एन. पाटील यांच्याच पदरात टाकले. अध्यक्षपदासाठी पी. एन. पाटील हेच दावेदार असून, उपाध्यक्ष पदासाठी नूतन संचालक मंडळातील ए. डी. पाटील- गुडाळ, ए. डी. चौगले - शिरगाव यांच्या नावाची चर्चा असून, ए. डी. चौगले यांचे नाव निश्चित मानले जात आहे.