शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोहीचा महाप्रवाह सत्ता उलथवेल

By admin | Updated: July 18, 2014 00:28 IST

भारत पाटणकर : सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने कोल्हापुरात सत्कार

कोल्हापूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देत अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रतिशब्द म्हणून ‘विद्रोही साहित्य संमेलना’ची चळवळ सुरू झाली. या विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्याचा महाप्रवाह बनवला तर तो सत्ता उलथवून टाकेल, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले. बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने पाटणकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्थ पोळके, डॉ. सतीश घाटगे, ज. रा. दाभोळे, डी. जी. भास्कर, बबनराव रानगे, आर. बी. कोसंबी, अनिल म्हमाणे उपस्थित होते. यावेळी पाटणकर यांचा घोंगडे, फेटा, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे संमेलन २ व ३ आॅगस्टला येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये होत आहे.पाटणकर म्हणाले, वास्तववादी साहित्य बहुजनांनी, शोषितांनी निर्माण केले म्हणून विद्रोहीचे पहिले साहित्य संमेलन जाणीवपूर्वक मुंबईतील धारावीमध्ये घेतले. आता दिल्लीतील सत्ता नागपुरातून चालवली जाते. पण, विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणारे एकत्र आले तर महाराष्ट्रात त्यांचा पराभव कोणी रोखू शकणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे वैदिक प्रकरण घडविले. आता महाराजांनी बहुजन उद्धारासाठी केलेल्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे. पोळके म्हणाले, ‘अखिल भारतीय’ नावाने जी साहित्य संमेलने होतात त्यात बहुजन साहित्यिक नसतो, वंचितांच्या जगण्याचे वास्तव नसले तरी अशा संमेलनावर सरकार लाखो रुपये उधळते. या विरोधात ही चळवळ सुरू आहे. संत तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबार्इंनी सामान्यांचे जगणे मांडले. दलित साहित्याने खऱ्या अर्थाने मराठीला सजग केले, पण ही वैदिक पद्धती विद्रोहाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कित्येक दाभोलकरांचे खून करत राहील. त्याच्याशी लढण्यासाठी सगळ््यांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी आर. बी. कोसंबी, सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब घस्ते यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)