शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ‘प्रकाश’ बनले सी.ए.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:52 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिद्द आणि कष्टाची तयारी असेल, तर अशक्यही शक्य करून दाखविण्याची किमया ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिद्द आणि कष्टाची तयारी असेल, तर अशक्यही शक्य करून दाखविण्याची किमया वडणगे (ता. करवीर) येथील प्रकाश शंकर कवडे यांनी करून दाखविली. विविध अडचणी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तब्बल सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर चार्टर्ड अकौंटंट पदाच्या (सीए) परीक्षेत त्यांनी बाजी मारली.कवडे कुटुंबीय मूळचे बानगे(ता. कागल) येथील आहे. शंकर कवडे हे नोकरीनिमित्त कोल्हापुरात आले. एका कापड दुकानात ते काम करू लागले. संसाराला हातभार म्हणून प्रकाश यांच्या आई चंद्रकला या शिलाईकाम करत होत्या.प्रकाश यांना डी. एड. करायचे होते. मात्र, बारावीला ५८ टक्के गुण असल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे प्रकाश यांनी शहाजी महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च स्वत: करण्याच्या उद्देशाने त्यांनी शासकीय ठेकेदार विजयकुमार भिके यांच्याकडे लेखनिक म्हणून काम सुरू केले. त्या ठिकाणी त्यांना सी. ए. अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. गणिताची आवड असल्याने त्यांनी सी. ए. होण्याचे ठरविले. त्यावर शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या हा सीए अभ्यासक्रम झेपणारा नाही. एमबीए करून अथवा अकौंटंट म्हणून काम करण्याचा सल्ला काहींनी दिला; पण कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर प्रकाश यांनी ‘सीए’ ची तयारी सुरू केली. पहिला टप्पा असणाऱ्या ‘सीपीटी’ला त्यांनी नोंदणी केली. अकौंटंट म्हणून काम करीत अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात सीपीटी उत्तीर्ण झाले. इंटरमीजिएटची तयारी करताना इंग्रजीची अडचण आली. त्यावर खासगी शिकवणी लावली. इंटरमीजिएट आणि आर्टिकलशिप करून सी.ए.च्या अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांची कमाई करीत बाजी मारली. त्यांना आई-वडील, पत्नी वर्षाराणी, बहिणी अरुणा बारडे, गीता तावडे, विजयकुमार भिके, विजय जाधव, सुमित बिरंजे, आशिष भोसले, राघवेंद्र बकरे, नीलेश परीट यांची मदत झाली.कधी गॅरेज, तर कधी सेंट्रिंग कामदहावीनंतर कधी गॅरेज, कापड दुकानात, तर कधी सेंट्रिंग काम, आॅफिसबॉय, तर कधी अकॅडमी, खासगी कार्यालयात अकौंटंट म्हणून काम करीत प्रकाश यांनी शिक्षण पूर्ण केले. अजूनही ते वडणगे येथे भाडेतत्त्वावरील घरात राहतात. दोन वर्षे प्रॅक्टिस करून पुढे स्वत:ची फर्म सुरू करण्याचे त्यांचे ध्येय आहे.