शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वर्षभरात १० लाख कर्मचारी, संस्थाचालक प्रशिक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:02 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील पाच सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभरात दहा लाख संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील पाच सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभरात दहा लाख संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्'ात सर्वाधिक पन्नास हजार जणांना प्रशिक्षित करण्याचे काम जिल्हा सहकारी बोर्ड व तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राने केले आहे.राज्य सरकारने २०१३ ला ९७ वी घटनादुरुस्ती केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांच्या कायद्यात बदल करण्यात आला. सहकारी संस्थांना नवीन कायद्यात स्वायत्तता दिली असली तरी काही कायदे कठोरही करण्यात आले आहेत. त्याची माहिती संस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासदांना व्हावी, यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. राज्यात पाच प्रशिक्षण केंद्रे कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.घटनादुरुस्तीपूर्वी सहकारी संस्थांमधून प्रशिक्षण केंद्रांना काही निधी दिला जात होता. त्यातून या केंद्रांचे कार्य चालायचे; पण आता प्रशिक्षणार्थींच्या फीमधूनच केंद्रांचा गाडा चालवावा लागतो. धनाजीराव गाडगीळ प्रशिक्षण केंद्र- नागपूर, विठ्ठलराव विखे-पाटील- पुणे, ‘यशदा’- पुणे, ‘वैकुंठभाई मेहता’- पुणे, महाराष्टÑ राज्य सहकार संघ, पुणे ही केंद्रे कार्यरत आहेत.गेल्या चार वर्षांपासून राज्यातील ५७ हजार ११३ सहकारी संस्थांच्या ३० लाख सभासद, संचालक व सेवकांना प्रशिक्षण दिले आहे. मागील दोन वर्षांत प्रशिक्षणाचे काम गतीने झाले आहे. गेल्या वर्षभरात १४ हजार ४३८ संस्थांच्या १० लाख सभासद, संचालक व कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून, कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्ड व तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ५० हजार जणांना वर्षभरात प्रशिक्षित केले.गेल्या चार वर्षांतील प्रशिक्षणाची आकडेवारीआर्थिक वर्ष संस्था सभासद संस्था संचालक संस्था कर्मचारी२०१४-१५ ९९७० २९४३७३ २३४ ५९७७ १२१४ ३१०७३२०१५-१६ १४३२४ ७४६५२७ ७०८ १२३३३ १०९९ २९७५७२०१६-१७ १३४१८ ९१५३२९ ७६९ १२१४९ ९३९ २५५४६२०१७-१८ १२४२३ ९५१३२५ ७९८ १३०७८ १२१७ ३६०९१