नवे पारगाव : सलग दोन दिवस सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरले. या वर्षीच्या पावसाळ्याच्या सलामीलाच वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. चिकूर्डे पुलाजवळचा बंधारा पाण्याखाली गेला आहे.
पारगाव परिसरात गेले दोन दिवस पाऊस झोडपत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला. सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, भात पिकाच्या पेरणी व उसाची लागण करण्यात शेतकरी व्यस्त होते. पावसामुळे शेती तुडुंब भरल्याने उगवण झालेल्या ऊस पिकास धोका झाला आहे. नुकत्याच पेरणी केलेल्या सोयाबीन, ऊस, भात, भुईमूग इत्यादी पिकात पाणी साचल्याने उगवण स्थितीत असणारी पिके पाण्याखाली गेली आहेत.
फोटो ओळी :
१. मुसळधार पावसामुळे वाठार-कोडोली राज्यमार्गावर नवे पारगाव येथील महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टजवळ रस्त्यावरती पाणी आले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली.
२. चिकूर्डे येथील बंधारा पाण्याखाली गेला.
(छाया : दिलीप चरणे)