शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:03 IST

कोल्हापूर : एकाही मतदाराची नोंदणी झाली नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकी च्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर पडली आहेत. या निवडणुकीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेतील मंगळवारी २९० अर्जांची विक्री झाली.या अधिसभा निवडणुकीअंतर्गत विद्यापीठातील एकूण चार विद्याशाखाअंतर्गत ४५ अभ्यास मंडळे आहेत. त्यांतील प्रत्येक अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयीन विभागप्रमुखांमधून तीन विभागप्रमुखांची निवड करण्यासाठी ...

ठळक मुद्देअभ्यासमंडळांसाठी एकाही मतदाराची नोंदणी नसल्याचा परिणामएकूण चार विद्याशाखाअंतर्गत ४५ अभ्यास मंडळे अधिसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी २९० अर्जांची विक्रीमागील निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट अर्ज

कोल्हापूर : एकाही मतदाराची नोंदणी झाली नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर पडली आहेत. या निवडणुकीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेतील मंगळवारी २९० अर्जांची विक्री झाली.

या अधिसभा निवडणुकीअंतर्गत विद्यापीठातील एकूण चार विद्याशाखाअंतर्गत ४५ अभ्यास मंडळे आहेत. त्यांतील प्रत्येक अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयीन विभागप्रमुखांमधून तीन विभागप्रमुखांची निवड करण्यासाठी निवडणूक होणार आहे. मात्र, या अभ्यासमंडळांपैकी १२ विषयांच्या अभ्यासमंडळांसाठी एकाही मतदाराची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या विषयांच्या अभ्यासमंडळांची निवडणूक होणार नाही.

यामध्ये फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण अभियांत्रिकी, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग, प्राकृत भाषा, मॉडर्न फॉरिन लँग्वेजेस अदर दॅन इंग्लिश, तत्त्वज्ञान, एनसीसी अ‍ॅँड एनएसएस, लायब्ररी अ‍ॅँड इन्फर्मेशन सायन्स, सोशल वर्क अ‍ॅँड अलाइड सब्जेक्टस, व्होकेशनल एज्युकेशन, परफॉर्मिंग अ‍ॅँड फाईन आर्टस या विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमांसाठी अनेक ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. त्याचा परिणाम हा मतदार नोंदणी न होणाºयावर झाला आहे. संबंधित अभ्यासमंडळे वगळता उर्वरित ३३ अभ्यासमंडळांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी या गटातून ८७७ मतदारांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, मतदार नसल्याने निवडणूक होणार नसलेल्या बारा अभ्यासमंडळांवर सदस्यांची निवड ही नियुक्तीद्वारे होणार असल्याचे समजते.

मागील निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट अर्जयावर्षीच्या अधिसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांत एकूण ४४० अर्जांची विक्री झाली आहे. मागील निवडणुकीमध्ये अर्जविक्रीच्या पूर्ण मुदतीत साधारणत: ३५० अर्जांची विक्री झाली होती. या वर्षीसाठी अर्जविक्री आणि स्वीकृतीसाठी अजून सात दिवसांची मुदत बाकी आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. 

 

टॅग्स :universityविद्यापीठElectionनिवडणूक