शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा गडहिंग्लज विभागातही जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी काळजी घ्यावी; अन्यथा कागलप्रमाणे गडहिंग्लज विभागातही कडक जनता कर्फ्यू लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिला.

गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले, कोरोना बाधितांचा मृत्यूदर देशात

कोल्हापूरचा अधिक आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी स्वत:हून चाचण्या करून घ्याव्यात. तपासण्या न झाल्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असणाऱ्या गावांत रेडअलर्ट घोषित करून सर्वांच्या चाचण्या करून घ्याव्यात.

बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भूदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे, आजऱ्याचे विकास अहिर, चंदगडचे विनोद रणावरे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, डॉ. चंद्रकांत खोत, रामाप्पा करिगार, उदय जोशी, अभय देसाई आदी उपस्थित होते.

बाधितांच्या प्रमाणात राज्यांना मदत द्या..!

तिसऱ्या लाटेपूर्वी महाराष्ट्रातील लसीकरण पूर्ण करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, सीरम, पुनावालासह स्फुतनिकच्या लसींचे सर्व अधिकार केंद्राने आपल्याकडे घेतले आहेत. लसींच्या वाटपात हस्तक्षेप न करता केंद्र शासनाने बाधितांच्या प्रमाणात सर्वच राज्यांना सर्वप्रकारची मदत करावी, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली.

गडहिंग्लज विभागात आणखी ३९० बेड

गडहिंग्लज विभागातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात १८०, चंदगड तालुक्यात ११० व आजरा तालुक्यात १०० असे एकूण आणखी ३९० बेडचे नियोजन करण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

फोटो ओळी-

गडहिंग्लज येथे कोरोना आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. डावीकडून गणेश इंगळे, राजेश पाटील, विजया पांगारकर, डॉ. संपत खिलारी उपस्थित होते.