शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा... रॉकेलच्या टँकरसह घर पेटवू

By admin | Updated: November 22, 2014 00:07 IST

टँकर परतला : इटेतील स्वस्त धान्य दुकानदाराबाबत ग्रामस्थ आक्रमक

आजरा : इटे (ता. आजरा) येथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून रॉकेलसह इतर धान्य स्वीकारण्याची ग्रामस्थांची मानसिकता नसताना, स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावा, यासाठी ग्रामस्थ ठाम असतानाही पुन्हा त्याच धान्य दुकानदाराकडे रॉकेल वितरणासाठी उतरवत असताना गावातील स्त्री-पुरुष शिधापत्रिकाधारकांनी जबरदस्तीने रॉकेल उतरवल्यास ज्या ठिकाणी रॉकेल उतरवणार त्या घरासह टँकर पेटविण्याचा इशारा दिल्याने अखेर रॉकेल न उतरवताच टँकर परतला.इटे (ता. आजरा) येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल शिवाजी कांबळे यांचा दुकान परवाना रद्द करून तो दुसऱ्या व्यक्तीस द्यावा, यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी मोर्चासह तहसीलदारांकडे तक्रारी दिल्या होत्या. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आजरा येथे इटे येथील शिधापत्रिकाधारकांसाठी रॉकेल व धान्य वितरणाची व्यवस्था केली होती. दरम्यान, कांबळे यांनी याप्रकरणी विभागीय आयुक्त (कमिशनर) यांच्याकडे दादा मागितली. कमिशनर यांनी कांबळे यांच्या बाजूने निर्णय दिल्याने शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रॉकेल उतरवण्यासाठी टँकर इटे येथे आला होता.दरम्यान, पुन्हा जुन्याच दुकानदाराकडे रॉकेल वितरणासाठी उतरवले जात असल्याचे लक्षात येताच गावातील महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी कांबळे, त्यांचे पती व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही ग्रामस्थांनी बॅरल व अन्य साहित्य पळवून नेले, तर रॉकेल जबरदस्तीने उतरवलेच तर टँकरसह संबंधित घर पेटवण्याचा इशाराही दिला.अल्पावधीतच पोलिसांसह तालुका पुरवठा अधिकारी रामलिंग तराळ, तलाठी महादेव देसाई, आप्पासाहेब पाटील घटनास्थळी हजर झाले. यानतंर ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीवेळी दुकानदार परवाना रद्द करून, बदलल्याशिवाय रॉकेलसह अन्य धान्य उतरवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने रॉकेल न उतरताच तालुका पुरवठा अधिकाऱ्यांसह टँकर परतला.यावेळी सरपंच विलास पाटील, संजय शेणवी, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी पाटील, बाळू यादव, माया पाटील, अनुसया तेजम, शारूबाई फगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजकीय सूडबुद्धीने तक्रारया घटनेबाबत बोलताना धान्य दुकानदार मंगला पाटील यांनी सरपंच विलास पाटील हे केवळ राजकीय सूडबुद्धीने ग्रामस्थांची ढाल करीत आहेत.कायदेशीर मार्गाने आपणाला परवानगी मिळाली आहे व त्यांनीही कायदेशीर मार्गाने दाद मागावी, असे स्पष्ट केले.सोमवारी फैसलातहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे या मिटींगनिमित्त कोल्हापूरला गेल्याने या प्रकरणाचा फैसला सोमवारीच होणार आहे.