शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा धुराडे पेटू देणार नाही : रघुनाथ पाटील

By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST

‘रंगराजन’च्या शिफारशीची मागणी : पाच एकरांवरील शेतकऱ्यांची कर्जे माफ करा

कोल्हापूर : सी. रंगराजन समितीने सुचविलेल्या शिफारशींमधील कारखान्यांच्या हवाई अंतराची अट रद्द करा व साखरेच्या उत्पन्नातील ७० टक्के वाटा ऊस दर म्हणून द्यावा, या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उसाचे कांडेही तोडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला.पाटील म्हणाले, मंत्री समितीने १५ आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे दर आम्हाला मान्य नाही. सी. रंगराजन समितीच्या शिफारशी जशाच्या तशा लागू करा, अशी मागणी होती; पण सरकारने कारखानदारांच्या फायद्याच्या दोन शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. साखरेचे दर पडले तर त्याचा तोटा केवळ शेतकऱ्यांच्या माथी, हे आता चालणार नाही. साखरेच्या उत्पन्नातील ७० टक्के वाटा ऊस दराच्या रूपाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे, त्याचबरोबर दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द होत नाही, तोपर्यंत एकही धुराडे पेटू देणार नाही, आगामी ऊस आंदोलनाबाबत ११ व १२ आॅगस्टला पुणे येथे कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा घेतला असून, त्यामध्ये या सर्व बाबींवर विस्तृत चर्चा केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विजेच्या बिलात सवलत दिल्याचा कांगावा राज्य शासन करीत आहे; पण मुळात जे देणे आम्ही लागत नाही, ते कसे माफ करता. शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यायची आणि चोवीस तासांचे पैसे वसूल करायचे असे सर्रास सुरू आहे. लूट करणाऱ्यांनाच पैसे देऊन शेतकऱ्यांवर मेहरबानी करीत असल्यासारखे सरकार जाहिरात करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. केंद्राने पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले;पण लहान शेतकऱ्यांचेच कर्ज थकते असे नाही, निसर्गाचा फटका सर्वांनाच सारखाच बसतो. त्यामुळे पाच एकरांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गूळ नियमन रद्द केले त्याचे स्वागत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)