या अनाथ बालकांनी जोडलेल्या संसाराला मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभ आशीर्वाद दिले.
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार वाहे! या उक्तीने
विवाह सोहळ्यासाठी संस्थापक पांडुरंग बापूसो वाळवेकर व संस्थापिका अध्यक्षा अलका वाळवेकर यांनी वधू-वरांना शुभआशीर्वाद दिले. अध्यक्ष संतोष वाळवेकर, सचिव सोनल वाळवेकर यांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले. विवाह सोहळ्याप्रसंगी बालकल्याण संकुलच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, सदस्या कांचन आंगडी, व्ही. बी. शेट्ये, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, बाजीराव पोवार, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा शिंदे, अध्यक्ष प्रशांत वाळवेकर, आसावरी वाळवेकर व स्व: बापूसाहेब जगदाळे बालगृहातील व कन्या निरीक्षण गृहातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
चौकट :
विवाह सोहळ्यास शिरा, मसाले भात, आमटी, बटाटा भाजी, पापड लोणचं, लाडू, या मेन्यूवर सर्वांनी आस्वाद घेतला. विवाहाचा संपूर्ण खर्च व नियोजन संतोष वाळवेकर यांनी केले.