शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

मूळ २९ कोटींचा प्रकल्प, गेला ११४ कोटींवर

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

काम रखडल्याचा फटका : आतापर्यंत ९५ कोटी रुपये खर्च; आणखी ५० कोटींच्या निधीची गरज

रवींद्र येसादे - उत्तूर -आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी सुरुवातीस २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, पहिली तीन वर्षे वगळता प्रकल्प १५ वर्षे रखडला. यामुळे वेळोवेळी महागाईमुळे प्रकल्पाच्या कामासाठी ११४ कोटी मंजूर करण्यात आले. त्यानुसार प्रकल्पाची कामे व पुनर्वसन आदींसाठी ९५.३६ कोटी रुपये खर्च झाले. प्रकल्पाचे उर्वरित काम व पुनर्वसनाच्या मंजूर रकमेसाठी ५० कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे. भू-संपादन व पुनर्वसनासाठी २१ कोटींची तसेच धरण व अनुषंगिक कामासाठी ४० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. अतिरिक्त ४१ कोटी जादा निधी उपलब्ध झाल्यास सन २0१६-१७ मध्ये घळभरणी होऊ न पाणीसाठा होऊ शकतो.आजअखेर प्रकल्प कामाची सद्य:स्थितीधरणाची माथापातळी ६९०.२३० मी. आहे. साखळी क्रमांक २१० मी., तर २०४० मी. भागातील रोधी चर खोदाई व भरावाचे काम पूर्ण झाले आहे. डाव्या व उजव्या तिरावरील कामासाठी निधीची गरज आहे. कोल्हापूर पद्धतीच्या सहा बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील बंधाऱ्यासाठी निधीची गरज आहे.मातकाम ७० टक्के पूर्णप्रकल्पाच्या डाव्या तिरावरील ६८१.० मी. व उजव्या तिरावरील ६८२.०० मी. तलावापर्यंत मातकाम आहे. हे काम ७० टक्केपूर्ण झाले आहे. उर्वरित काम अद्याप अपूर्णच राहिलेले आहे.विद्युत विमोचक सिंचन तथा विद्युत विमोचकाचे खोदकाम पूर्ण झाले असून, ऊर्ध्वनलिका, शुष्कविहीर, पाणतळ व यांत्रिकी घटकांची कामे ८० टक्के पूर्ण आहेत.सांडवा काम अंतिम टप्यातप्रकल्पास द्वाररहित डकबिल प्रकारचा सांडवा आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची लांबी ८० मी.असृून त्याची खुदाई पूर्ण आहे. सांडवा पुच्छ कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडवा संधानकाचे ५ टक्के काम पूर्ण होणे बाकी आहे.घळभरणीचे काम जवळपास पूर्णप्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील मातकाम व दगडी पिचिंगचे काम पूर्ण झाले आहे. आधी पुनर्वसन मगच घळभरणी, असा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे घळभरणीचे काम २० टक्के अपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम सध्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, विस्थापितांचे प्रश्न अर्धवट स्थितीत आहे.