पोहाळे तर्फ आळते : कुशिरे, ता.पन्हाळा येथे महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबूचमचा, घोषवाक्य अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या. याचे आयोजन ग्रामपंचायत कुशिरे यांच्या वतीने करण्यात आले. विजेत्या महिलांना सरपंच अनुराधा घोरपडे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सुनीता गुरव, अर्चना ठाणेकर, लता बारडे यांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन केले. याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सर्जेराव घोरपडे, एस.एच. पोवार, भाग्यश्री दीपक क्षीरसागर, दीपाली नथुराम कदम, सुजाता आनंदराव बंडगर यांच्यासह उपसरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील, संतोष साबळे, बाबासो माने, आनंदी पाटील, राजाक्का पाटील, रेखा ठाणेकर, मंगल कळके यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कुशिरे येथे विविध स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:23 IST