शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

संजय कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 5, 2015 01:03 IST

व्यापाऱ्यांना वेठीस धरले : बाजार समितीच्या कनिष्ठ अभियंतापदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी

कोल्हापूर : पदाचा दुरुपयोग करून आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या फर्मच्या माध्यमातून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील बांधकामे करून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या व व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कनिष्ठ अभियंता संजय बळवंत कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बुधवारी (दि. ३) दिले. कागलच्या सहायक निबंधक (सहकारी संस्था) अरुणा पाटील यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. चोकाक (ता. हातकणंगले) येथील मानसिंग बाबूराव ढेरे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी होत आहे.संजय कुलकर्णी हे बाजार समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर सुशांत एंटरप्रायजेस ही बांधकाम व्यावसायिक फर्म सुरू केली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करीत बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना वेठीस धरून सर्व बांधकामे आपल्या फर्मला घेतली आहेत. त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपये उकळले आहेत. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून केली जाणारी बांधकामे आपल्या फर्मच्या माध्यमातूनच करावीत, अशी सक्ती त्यांच्याकडून केली जात होती. त्यांना काम मिळाले तरच बांधकाम परवानगीची फाईल तातडीने मंजूर व्हायची अन्यथा अनेक महिने व्यापाऱ्यांना ताटकळावे लागायचे, असे ढेरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात २०१४ मध्ये तत्कालीन प्रशासक महेश कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती; परंतु त्यानंतरच्या प्रशासकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या संदर्भात मानसिंग ढेरे यांनी कार्यकारी संचालक, कृषी-पणन मंडळ, राज्य पणन संचालक (पुणे), जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), विभागीय सहनिबंधक, बाजार समिती प्रशासक यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांची दखल घेत कार्यकारी संचालक, कृषी-पणन मंडळ, राज्य पणन संचालक (पुणे)यांच्या आदेशाद्वारे जिल्हा उपनिबंधकांनी संजय कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. त्यांची चौकशी व्हावी यासाठी आपण अनेक तक्रारी देऊन पाठपुरावा केला आहे. त्यानुसार त्यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अधिकाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने काम होईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आपल्यासमोर न्यायालयात जाण्याचाही पर्याय आहे.- मानसिंग ढेरे, तक्रारदार