शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ सभेची चौकशी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाबाबत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक अरुण चौगले यांना दिले आहेत.‘गोकुळ’च्या दि. १५ सप्टेंबरला झालेल्या ५५ व्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने हरकत ...

ठळक मुद्देविभागीय उपनिबंधकांनी घेतली दखल : अहवालावर ठरणार सभेचे भवितव्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाबाबत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक अरुण चौगले यांना दिले आहेत.‘गोकुळ’च्या दि. १५ सप्टेंबरला झालेल्या ५५ व्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने हरकत घेतली आहे.संघाचे संचालक अथवा सक्षम अधिकारी नसताना महादेवराव महाडिक यांनी अहवाल हातात धरून सर्व विषय एका दमात मंजूर कसे केले? असा सवाल करीत सभेच्या झालेल्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार सतेज पाटील व माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने दि. १९ सप्टेंबरला सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांना निवेदन दिले होते.चौगले यांनी निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले होते. त्यानुसार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. ‘गोकुळ’च्या झालेल्या सभेची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश अरुण चौगले यांना दिले आहेत. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुद्देनिहाय अहवाल सादर करामहाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० चे ‘कलम ७५’ व ‘नियम ६०’ मधील तरतुदीनुसार संघाच्या झालेल्या सभेचे कामकाज व निवेदनातील १ ते ८ मुद्द्यांबाबत आपला मुद्देनिहाय सुस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेली तीन आठवडे गाजत असलेल्या ‘गोकुळ’ सभेच्या कामकाजाची चौकशी होणार असून, या अहवालावरच सभेचे भवितव्य ठरणार आहे.