शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या नोकऱ्यांसाठी अनुदान रोखण्याचे आदेश

By admin | Updated: October 25, 2016 01:08 IST

शासनाचे आदेश : तीन टक्के नोकऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी

दत्ता बिडकर --हातकणंगले -शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये अपंगांच्या तीन टक्के नोकऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अपंगांना १ ते ३४ बिंदू नियमावलीनुसार नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, असा शासन आदेश असतानाही अपंगांना नोकऱ्या दिल्या जात नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. शासन नियमानुसार कार्यवाही होत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे, शासकीय अनुदान प्राप्त संस्थांचे वार्षिक अनुदान तत्काळ रोखण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रांत खळबळ उडाली आहे.अपंगांचा अनुशेष भरून काढण्यासाठी अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ राज्यामध्ये लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासन अनुदानप्राप्त संस्था, प्राधिकरणे, महामंडळे, शासकीय भागभांडवल गुंतले आहेत, अशा संस्थांमध्ये तीन टक्के नोकऱ्यांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र, याचे काटेकोर पालन होत नसल्याने शासनाने २७ एप्रिल २00४ला शासन निर्णय घेऊन याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले होते.अपंगांच्या आरक्षणासंदर्भात आणि नियुक्ती व पदोन्नतीबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १0/११/२00४ रोजी निर्णय घेऊन अपंग कर्मचाऱ्यांना गट ‘क’ आणि गट ‘ड’मधील नियुक्ती देताना शंभर रिक्त पदांची नोंद ठेवून अपंगांच्या भरतीसाठी बिंदू नियमावली तयार केली आहे. यामध्ये एक पदापासून ३४ पदांपर्यंत एक अपंग कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. अपंग व्यक्ती अधिनियमानुसार भरती वर्षामध्ये एखादी व्यक्ती त्या वर्षात उपलब्ध झाली नाही, तर आरक्षणानुसार सदरचे पद तीन वर्षांपर्यंत रिक्त ठेवून अपंग व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात यावी, असेही आदेश दिले आहेत. तातडीने जागा भरा : शासकीय कार्यालयांमध्ये खळबळअपंग व्यक्तींना नोकरीमध्ये समान संधी व त्यांच्या हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग कृती आराखडा अंमलबजावणीसाठी शासनाने २0/७/२0११ च्या आदेशाने ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगरपरिषदा, आणि महानगर पालिका यांना तीन टक्के अपंगांच्या जागा तातडीने भरण्याचे आदेश दिले. या सर्वच शासकीय यंत्रणांनी शासन आदेश धाब्यावर बसवून अपंगांची दखल घेतली नाही. म्हणून शासनाने प्रतिनिधी अपंग/२0१५/ प्र. क्र. २२/ अ, क्र, ५/२५ फेब्रुवारी २0१५ शासन निर्णय घेऊन अपंग कल्याण कृती आराखडा २00१ ची अंमलबजावणी करावी, असे आदेश देऊन शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालये, शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गंभीर कार्यवाही होत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून ज्यांच्याकडून अपंग व्यक्ती अधिनियमाची अंमलबजावणी होत नाही, अशी सर्व शासकीय कार्यालये, प्राधिकरणे, महामंडळे, शासकीय भागभांडवल गुंतले आहे, अशा संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांसह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे वार्षिक अनुदान तत्काळ रोखण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.