शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘महाद्वार’ फेरीवाला क्षेत्र करण्यास मनाई आदेश

By admin | Updated: March 2, 2016 00:44 IST

दिवाणी न्यायालय : पुढील सुनावणी १७ मार्चला

कोल्हापूर : फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची पर्यायी जागा म्हणून महाद्वार रोड व ताराबाई रोड येथे फेरीवाला क्षेत्र करण्यास येथील दहावे कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती के. एम. चव्हाण यांनी मंगळवारी तुर्तातूर्त मनाई केली. याची पुढील सुनावणी १७ मार्चला होणार असून महानगरपालिकेस म्हणणे मांडण्याबाबत बजावण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ‘फेरीवाला क्षेत्र’ व ‘ना फेरीवाला क्षेत्र’ जाहीर केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत मोठी वर्दळ असलेल्या ताराबाई रोड व महाद्वार रोड ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर केले परंतु फेरीवाला कृती समितीच्या आक्षेपानंतर महाद्वार रोडवर महानगरपालिका प्रशासनाकडून सारडा दुकान ते पापाची तिकटी आणि ताराबाई रोडवर कपिलतीर्थ मार्के ट ते रंकाळा चौपाटी या मार्गावर ‘फेरीवाला क्षेत्र’ करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी या रस्त्यावर फेरीवाल्यांना पट्टे मारून देण्यात येत होते. त्यामुळे व्यापारीवर्गात असंतोष पसरला होता. आंदोलन करून पट्टे मारून देण्याचे काम बंद पाडले होते. याबाबत व्यापारी व उद्योजक महासंघाच्यावतीने १६ व्यापाऱ्यांनी येथील दहावे कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती के. एम. चव्हाण यांच्या न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. व्यापाऱ्यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद मेहता यांनी बाजू मांडली. महाद्वार रोड व ताराबाई रोड वर्दळीचे प्रमुख रस्ते असून या परिसरात शाळा, यात्री निवास, मंदिरे, व्यावसायिक दुकाने मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी पुन्हा फेरीवाला क्षेत्र चुकीचे करणे उचित ठरणार नाही, त्यामुळे त्यास मनाई केली जावी, अशी विनंती अ‍ॅड. मेहता यांनी न्यायालयास केली होती. ती न्यायालयाने मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत महापालिकेच्या फेरीवाला क्षेत्र करण्याच्या प्रयत्नांना मनाई केली. महानगरपालिकेचे अधिकारी त्यांचे म्हणणे जोपर्यंत न्यायालयात मांडत नाहीत, तोपर्यंत ही मनाई राहणार आहे. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘ ना फेरीवाला क्षेत्र’ बदलण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहेसांगली- मिरज येथून येणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव करण्यात यावाविक्रेत्यांची बायोमेट्रीक कार्डची तपासणी करावी अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी केली.