शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री होण्यासाठी अगोदर निवडून यावे लागते

By admin | Updated: May 5, 2017 23:44 IST

मुश्रीफ यांचा गर्भित इशारा : दादांचे वक्तव्य अनाकलनीय

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘खासदार धनंजय महाडिक हे केंद्रात मंत्री असतील,’ हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विधान अनाकलनीय आहेच; परंतु मंत्री होण्यासाठी अगोदर लोकसभा निवडणुकीत निवडून यावे लागते, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांसह महाडिक यांनाही दिला. निवडून न येताही मंत्री होता येते, पण त्यासाठी सत्ता हवी आणि थेट पंतप्रधानाच्या मनात आले तर हे शक्य असल्याची मिश्कील टिप्पणीही आमदार मुश्रीफ यांनी केली. दादा तसे काय करणार असतील तर ते मला काय माहित नाही, अशीही पुस्ती त्यांनी हसत हसत जोडली.अंबाबाई सुवर्ण पालखी सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांनी ‘सन २०१९ ला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे केंद्रात मंत्री असतील,’ असे भाकीत केले. खासदार महाडिक यांची भाजपशी असलेली जवळीकता पाहता पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्याला फार महत्त्व आहे. याबाबत आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना २०१९ मध्ये मंत्री करण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वक्तव्य अनाकलनीय आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षांचे सरकार येणार आणि त्यात महाडिक मंत्री असतील, असे ‘दादां’ना म्हणायचे नसेल ना? की महाडिक यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्री करणार, असे दादांच्या वक्तव्याचे दोन अर्थ निघू शकतात. घटनेनुसार मंत्री होण्यासाठी निवडून येणे गरजेचेही नाही. मंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे असते.’महाडिक यांचे मौनपालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार महाडिक काहीच बोललेले नाहीत. वास्तविक त्यांनी यावर बोलून त्यांच्याविषयी निर्माण झालेले संशयाचे वातावरण स्वच्छ करणे गरजेचे होते.