शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मूळ कामावर हजर होण्याचे आदेश

By admin | Updated: January 20, 2016 01:04 IST

आयुक्तांनी दिला धक्का : शंभर झाडू, सफाई कामगारांच्या बदल्या

कोल्हापूर : मूळ नेमणूक ‘झाडू कामगार किंवा सफाई कामगार’ अशी आहे; परंतु प्रत्यक्ष काम मात्र कार्यालयात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली करतात. झाडू कामगार असूनही ‘साहेबा’च्या अविर्भावात काम करणाऱ्या १०० झाडू व सफाई कर्मचाऱ्यांना मंगळवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बदल्या करून चांगलाच धक्का दिला. त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले महानगरपालिकेतील आरोग्य विभागात ‘झाडू किंवा सफाई कामगार’ म्हणून नेमणूक झालेल्या अनेक कामगारांनी कर्मचारी संघटनेचे नेते, अधिकारी, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा वशिला लावून मूळ कामातून सुटका करून घेत पालिकेच्या विविध कार्यालयांत क्लार्क म्हणून काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या वशिलेबाज कामगारांनी ‘साहेबी’ थाटात काम केले; परंतु त्याचा प्रामाणिक कामगारांवर अन्याय होत राहिला. शिवाय सफाईच्या कामावरही त्याचा परिणाम झाला आहे. प्रभागात झाडू कामगार मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या विषयावर महानगरपालिका सभागृहात नगरसेवक भूपाल शेटे यांनी आवाज उठविला होता. अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत ‘झाडू कामगार दाखवा, पेहरावा करू’ अशा शब्दांत टीका केली होती. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा कामगारांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करण्यास कामगार विभागास सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १०० कामगारांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व कामगार असूनही कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होते. या सर्व कामगारांच्या बदल्या केल्याचे आदेश आयुक्तांनी सोमवारी काढले आणि ते मंगळवारी बजावण्यात आले. आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करायची असून जे कर्मचारी मूळ कामावर हजर होणार नाहीत किंवा वशिला लावण्यासाठी राजकीय दबाव आणतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या घरात कामगार अनेक वरिष्ठांच्या घरात धुणे-भांडी करण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी महापालिकेतील कामगार काम करत आहेत. ते महापालिकेत कधीही फिरकत नाहीत. केवळ पगार घेण्यासाठी तसेच अन्य कामांसाठीच येतात. त्यामुळे या सर्व कामगारांनाही मूळ कामावर पाठवा, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे.