शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या ‘जीएसटी’ नोंदणीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:54 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शाळांना वस्तू व सेवाकराची (जीएसटी) नोंदणी करण्याचे आदेश राज्य प्राथमिक शिक्षण ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाळांना वस्तू व सेवाकराची (जीएसटी) नोंदणी करण्याचे आदेश राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालकांनी दिले आहेत; मात्र, त्याला जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांकडून विरोध होत आहे. संबंधित आदेश मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालकांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांना जीएसटीची नोंदणी करावी लागणार आहे. या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना जीएसटी नोंदणीबाबतची सूचना दिली आहे; मात्र, जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी याकडे पाठ फिरविली आहे. शासनाकडून मिळणाºया तुटपुंज्या अनुदानावर शाळांचे कामकाज सुरू आहे. त्यातच जीएसटीची नोंदणी करणे, त्याचे खाते सांभाळण्याचा खर्च करणे या शाळांना परवडणारे नसल्याचे सांगत जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध २७ संघटनांचे व्यासपीठ शैक्षणिक व्यासपीठाने या निर्णयाचा निषेध करीत त्याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान, याबाबत झेडपीचे उपशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जीएसटी नोंदणी करण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे.अन्यायकारक आदेशशाळांना ‘जीएसटी’ची नोंदणी करण्याबाबत प्राथमिक शिक्षण परिषदेने दिलेला आदेश अन्यायकारक आहे. अनुदानित शाळा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत. त्यामुळे त्यांना जीएसटीची नोंदणी करायला लावणे चुकीचे असल्याचे जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी सांगितले. शासनाकडून मिळणाºया तुटपुंज्या अनुदानावर या शाळा चालविल्या जातात. त्यांना जीएसटी नोंदणी आणि त्याअनुषंगाने अन्य खर्च करणे परवडणारे नाही; त्यामुळे प्राथमिक शिक्षण परिषदेच्या आदेशाचा निषेध करत आहे. हा आदेश मागे घ्यावा अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लाड यांनी दिला.जिझिया कराची सक्ती केल्यासारखेअनुदानित सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या व्यवसाय करून नफा मिळवीत नाहीत. उलट, समाजाच्या मदतीने शिक्षणासाठी काम करतात. अशा शाळांना जीएसटी नंबर घेण्याची सक्ती करणे म्हणजे जिझिया कराची सक्ती केल्यासारखे आहे. त्याला माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफच्या वतीने तीव्र विरोध केला जाईल, असे कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफचे अध्यक्ष राजेश वरक यांनी सांगितले. ते म्हणाले, इतर समविचारी संघटनांना एकत्र करून आंदोलन केले जाईल. या शाळांचा घरफाळा माफ करावा, वीज आणि पाणीबिल घरगुती दराने आकारावे, अशी मागणी आहे.