शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या अमृत योजनेला बंदने विरोध

By admin | Updated: June 11, 2016 00:52 IST

नदीकाठच्या गावांत आंदोलन : वारणा नदीतून पाणी देणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांना ठराव देणार : कृती समिती

जयसिंगपूर/दानोळी/यड्राव : वारणा नदीचे पाणी इचलकरंजीच्या अमृत योजनेला देणार नाही, या विरोधात वारणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावांनी शुक्रवारी कडकडीत बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदविला आहे़ हे जनआंदोलन अमृत योजना नामंजुरीसाठी उभारले आहे़ वारणाकाठच्या गावांचा ठराव अमृत योजनेच्या विरोधात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याचा निर्णय वारणा बचाव कृती समितीकडून घेण्यात आला आहे़ वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार हाळवणकर यांनी अमृत योजना मंजूर करून आणली आहे़ मात्र, या योजनेला वारणाकाठच्या गावांतून मोठा विरोध झाला आहे़ यामध्ये शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कवठेसार, यड्राव, कोथळी, उमळवाड, कुंभोज, हिंगणगाव, किणी, भादोले, खोची, नरंदे, नवे पारगाव, जुने पारगाव, घुणकी, वाठार, हिंगणगाव, तळसंदे, भेंडवडे, लाटवडे, चावरे, तर सांगली जिल्ह्यातील बागणी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, शिगाव, आदी गावे बंद ठेवून गावातील सर्व व्यवहार दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते़ दरम्यान, खऱ्या अर्थाने अमृत योजनेच्या विरोधात ही लढाई सुरू झाली आहे़ आमदार हाळवणकर यांनी इचलकरंजी शहरासाठी दानोळी येथील वारणा नदीतून पाणी नेण्यासाठी अमृत योजना मंजूर करून आणली आहे़ या विरोधात दानोळी येथे वारणा बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे़ या कृती समितीला वारणाकाठावरील सर्व गावांतून पाठिंबा मिळाल्यामुळे शुक्रवारी कृष्णाकाठावरील गावे कडकडीत बंद होती़ चांदोली धरणापासून वारणा नदीतील आपल्या हक्काचे पाणी अमृत योजनेला द्यायचे नाही यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वारणाकाठच्या गावांना भेटी देऊन या लढ्यात सामील करून समितीची ताकद वाढविली. याची सुरुवात शुक्रवारी शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या निर्णयाच्या विरोधात गावागावत कडकडीत बंद करून करण्यात आली़ दरम्यान, सायंकाळी पाचनंतर व्यवहार सुरळीतपणे सुरू झाला. कुंभोज, हिंगणगावला कडकडीतकुंभोज : वारणा नदीतून दानोळी येथून इचलकरंजी शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनास विरोध म्हणून कुंभोज, हिंगणगाव ग्रामस्थांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले. तारदाळ, खोतवाडीतही बंदतारदाळ : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीपात्रातून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्याला विरोध करण्यासाठी तारदाळ, खोतवाडी (ता. हातकणंगले) गावांनीही एकीचे बळ दाखवून शुक्रवारी व्यवहार बंद ठेवले. त्यासाठी या गावातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला. यावेळी पं. स. सदस्य रंगराव खांडेकर, सुकुमार कोळी, सुरेश पोवार, अशोक चौगुले, राहुल पोवार, सचिन चौगुले, यासीन मुजावर, विजय पाटील, रमेश नर्मदे, डॉ. संदीप खोत, तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.