शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठावरून अमृत योजनेला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:40 IST

उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे ...

उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे म्हणाले, कोथळी हे क्रांतिकारकांचे गाव आहे. कृषी संपन्नता असलेले व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे चळवळीतील गाव आहे़ दानोळीनंतर कोथळीकरही ही योजना एकीच्या बळावर हाणून पाडतील, असे त्यांनी सांगितले.यावेळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, शासनाने अमृत योजना रद्द करण्याऐवजी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे़ त्यामुळे कृष्णा नदीतून काही झाले तरी मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, कोथळीजवळच्या संगमातूनच पाणी घेण्याचे अद्याप निश्चित नसतानाही अधिकारी येऊन पाहणी करतात, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दानोळीप्रमाणेच कोथळीकरांच्या पाठीमागेही खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.सावकार मादनाईक म्हणाले, पंचगंगेचे पाणी दूषित झाल्यामुळे हे पाणी पिण्याला तर सोडाच, शेतीलासुद्धा पाजायच्या लायकीचे राहिलेले नाही़ वारणेचे पाणी घेऊन पुन्हा वारणा दूषित करण्याचा डाव शासनाने आखला आहे. या योजनेच्या कामावर होणारा खर्च प्रशासनाने शुद्धिकरणासाठी खर्च करावा, असे त्यांनी सांगितले.बैठकीस पं. स. सदस्य राजगोंडा पाटील, सरपंच अमृता पाटील, उपसरपंच सागर पुजारी, धनगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, बाहुबली इसराण्णा, दिलीप पाटील, सर्जेराव शिंदे, मानाजीराव भोसले, शीतल पाटील-धडेल, बापूसो दळवी, केशव राऊत, प्रसाद धर्माधिकारी, सतीश मलमे, विद्याधर कर्वे, विजय पाटील, सुकुमार नेजकर, भीमगोंडा बोरगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ वृषभ पाटील यांनी आभार मानले.आरोग्याचा प्रश्न गंभीरकोथळी संगमावरून अमृत योजना नेली तर पुढील गावांना सांगलीच्या शेरी नाल्याचे पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहराबरोबरच दोन्ही बाजूच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असून, पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीत सांगितले.बैठकीतील ठरावसंगमालगतच्या शेतजमिनी कोणीही योजनेसाठी देणार नाही.गावावर कोणतेही संकट आल्यास भोंगा वाजवून सूचना देणे.कोथळी हद्दीतून योजनेस विरोधाचा गावसभेत ठराव करणे.यापुढे चर्चा नाही, पाणीही नाही. त्यामुळे ही पहिली व शेवटची बैठक.