शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ मधून बक्षिसाची संधी

By admin | Updated: September 22, 2015 00:32 IST

मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम : कलर्स आणि ‘लोकमत’ सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा, नैवेद्य, हार व पूजा याचा सुरेख संगम

कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्त ‘कलर्स व लोकमत ‘सखी मंच’ने ‘आपले बाप्पा’ या उत्सवात ‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. २४) सायंकाळी चार वाजता विविध स्पर्धांचे आयोजन डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे केले आहे. यानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमधून नैवेद्य, हार व पूजा याचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवानिमित्त ‘आपले बाप्पा’ या सोहळ्याचे ‘कलर्स व लोकमत’च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन केले आहे. सुखकर्ता श्री गणेश म्हणजे बुद्धी देवता होय. मोठ्या उत्साहात, दिमाखात या बुद्धी देवतेची आराधना करून तिची यथायोग्य पूजा केली जाते. गणेशाला नैवेद्य, आरती हार-फुले अर्पण करून प्रसन्न केले जाते. संपूर्ण मानवजातीवर गणेशाच्या कृपेचा वरदहस्त राहावा म्हणून आपण गणेशाला साकडे घालत असतो. संस्कृती जपणाऱ्या ‘कलर्स चॅनेल’वर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रसारित होणारी ‘बालिका वधू’ ही पारिवारिक व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी व सर्वांत अधिक काळ चालणारी म्हणून जिला बहुमान मिळाला ती मालिका आता दोन हजाराव्या भागाकडे वळते आहे. आपल्या समाजातील बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष या मालिकेत दाखविला आहे. लहान मुलगी ते सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी प्रगल्भ आनंदीचा जीवनप्रवास आणि इतर सामाजिक घडामोडींमुळे मालिका प्रत्येक भागात उत्कंठा वाढविणारी ठरली आहे. आनंदीची हरविलेली मुलगी तिला भेटेल का? ती आनंदीला आपली आई मानेल का? या सर्व प्रश्नांचा उलगडा २००० व्या भागात होणार आहे. अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे (मो. ९६२३८९५८६६) यांच्याशी संपर्क साधावा.मोदक, पुष्पहार, गणेश रेखाटन स्पर्धा मोदक स्पर्धा, गणेश रेखाटन स्पर्धा आणि पुष्पहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदक स्पर्धेसाठी तिखट अथवा गोड मोदक घरातून करून आणायचे आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी मांडणी करावयाची आहे, त्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पुष्पहार स्पर्धेसाठी सर्व साहित्य घरून आणावयाचे आहे. स्पर्धेसाठी अर्ध्या तासाचा वेळ आहे. गणेश रेखाटन स्पर्धेसाठी रांगोळीसोबत पाने, फुले, हळद-कुंकू, अष्टगंध याचा वापर करून गणपतीची रांगोळी रेखाटायची आहे. रेखाटन करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सखींसाठी ‘कलर्स चॅनेल’कडून प्रत्येकीला आकर्षक पूजा थाळी भेट देण्यात येणार असून ‘सखी मंच ओळखपत्र’ आवश्यक असून वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सखींना पैठणी जिंकण्याची संधी सखींसाठी ‘वन मिनिट गेम शो’चे आयोजन करण्यात आले असून एका भाग्यवान सखीला पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच ‘कलर्स चॅनेलवरील’ ‘बालिका वधू’ मालिकेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.